दिवस प्रचंड रटाळ असतो जेव्हा…, News9 Global Summit मध्ये नरगिस फाखरीचं मोठं वक्तव्य
Nargis Fakhri: 'दिवस प्रचंड रटाळ असतो जेव्हा...', News9 Global Summit मधील नरगिस फाखरीचं मोठं वक्तव्य तुफान चर्चेत..., अभिनेत्री कायम कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Nargis Fakhri: ‘रॉकस्टार’, ‘मैं तेरा हीरो’, ‘हाउसफुल 5’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री नरगिस फाखरी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. दरम्यान, नरगिस फाखरी हिने टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये हजेरी लावली. यावेळी नरगीस हिन करीयर आणि रोजच्या रुटीनबद्दल यांसारख्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या.
यावेळी नरगिस फाखरी हिला दिवसातील कोणती वेळ सर्वात जास्त आवडते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नरगिस फाखरी म्हणाली, ‘माझा दिवस प्रचंड रटाळ असतो. कारण जेव्हा मी काम करत असते. तेव्हा माझ्या भोवती अनेक लोकांची गर्दी असते. मी कायम प्रवास करत असते. लोकांसोबत बोलत असते. पण जेव्हा मला सुट्टी असते. तेव्हा सर्वकाही हळू हळू सुरु असतं.’
‘सुट्टीच्या दिवशी मी एका कासवाप्रमाणे असते. मी सकाळी लवकर उठते… हळू हळू किचनमध्ये जाते. मसाला चाह बनवते. मी तिथे चहा उकळताना पाहते. मग मी बाल्कनीत बसून बाहेरच्या जागेकडे पाहत राहते. आणि दिवस असाच जातो…’ असं देखील नरगिस म्हणाली.
नरगिस हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नरगिस हिने 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकस्टार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं होतं. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने दमदार कामगिरी केली. नुकताच झालेल्या कार्यक्रमात नरगिस म्हणाली, ‘रॉकस्टार या सिनेमानंतर मला वाटलं नव्हतं की मी, बॉलिवूडमध्ये टिकून राहू शकेल. पण मी भाग्यवान होती. मला ‘ढिशूम’, ‘मद्रास कॅफे’ सारख्या सिनेमांमध्ये काम मिळालं…’ असं देखील नरगिस म्हणाली.
नरगीस हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नरगिस हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील नरगिस हिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.