AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक – नताशा यांनी गुपचूप लग्न उरकल्यानंतर जावयाला भेटले नव्हते आई – वडील, कशी होती प्रतिक्रिया?

Natasa Stankovic - Hardik Pandya : गुपचूप लग्न उरकल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा नताशाच्या आई-वडीलांना भेटला हार्दिक पांड्या, कसं झालं जावयाचं स्वागत, व्हिडीओ व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांड्या - नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाची चर्चा...

हार्दिक - नताशा यांनी  गुपचूप लग्न उरकल्यानंतर जावयाला भेटले नव्हते आई - वडील, कशी होती प्रतिक्रिया?
| Updated on: May 28, 2024 | 9:55 AM
Share

भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2020 मध्ये नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न केलं. लॉकडाऊन काळात दोघांनी घरीच लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यात दोघांनी मुलगा अगस्त्य याचं जगात स्वागत केलं.

नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न केल्यानंतर अभिनेत्रीचे आई-वडील जावयाला दोन वर्षांनंतर भेटले. आई – वडील आणि हार्दिक यांच्या पहिल्या भेटीचा नताशा हिने व्लॉग तयार केला होता. नताशा हिने व्लॉग तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला होता.

नशाता हिची आई Rada आणि वडील Goksi दोघे देखील हार्दिक याला भेटल्यानंतर आनंदी होते. त्यामध्ये कोणती भांडणं देखील नव्हती. पहिल्या भेटीत नताशा हिच्या आई म्हणाल्या होत्या, ‘मला माहिती होतं, हार्दिक मला भेटायला नक्की येईल.’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडीओ हार्दिक याने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

व्हिडीओ पोस्ट क्रिकेटरने कॅप्शनमध्ये, ‘पहिली भेटीपर्यंत… नताशा हिचं कुटुंब आता माझं देखील कुटुंब आहे. या क्षणांसाठी मी आभारी आहे. त्यांना भेटून फार छान वाटलं.’ सर्व काही चांगलं असताना नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा का रंगत आहेत? असा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे.

सांगायचं झालं तर, 2020 मध्ये गुपचूप लग्न केल्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी 2023 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नात कुटुंबिय, मित्र-परिवार आणि त्यांचा मुलगा देखील सामिल होता. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सध्या सर्वत्र फक्त नकाशा – हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालंतर, तिने मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. मॉडेल म्हणून अभिनेत्रीने करियरची सुरुवात केली. लग्नानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण सोशल मीडियावर नताशा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा