SSR Drug Case |  सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्याला तस्कराला अटक, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता!

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. सुशांतला ड्रग्स पुरवणाऱ्या पेडलरला एनसीबीने अटक केली आहे.

SSR Drug Case |  सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्याला तस्कराला अटक, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता!
सुशांत सिंहराजपूत

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. सुशांतला ड्रग्स पुरवणाऱ्या पेडलरला एनसीबीने अटक केली आहे. समीर वानखेडे यांनी वृत्तसंस्था एएनआयला या संदर्भात माहिती देताना सांगितले की, एनसीबीने गोवा येथून मादक पदार्थांची खरेदी करणार्‍या तीन लोकांना अटक केली आहे, त्यापैकी एक अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स पुरवठा करत होता (NCB arrest drugs peddler who was supplying drugs to sushant singh Rajput).

यापूर्वी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असून, तेथून बरेच ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत. वृत्तानुसार, पेडलर्स आणि ड्रग्ज दोन्हीही ताब्यात घेण्यात आले.

पाहा ट्विट

एनसीबीने दाखल केले आरोपपत्र

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने कोर्टात 12,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, एनसीबीने हे आरोपपत्र 33 लोकांविरोधात दाखल केले आहे. हे सर्व लोक सुशांतला ड्रग्ज पुरवठा आणि खरेदी, तसेच इलिसिट फायनान्सशी थेट जोडलेले आहेत.

या संपूर्ण यादीमध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, ड्रग पेडलर्स करमजित, आझम, अनुज केसवानी, डुआने फर्नांडिस आणि अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ यांची नावे देखील आहेत. अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भावाच्या घरीही चरस सापडला होता. या चार्जशीटमध्ये त्याचे नावही आहे. रिया आणि शौविक यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याचा अर्थ असा की, त्यांच्याकडून औषध खरेदी, इलिसिट फायनान्स आणि ट्राफिकिंग केले जात होते.

छाप्यात एनसीबीला काय मिळाले?

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, बंदी असलेली औषधे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि विदेशी चलन व्यतिरिक्त भारतीय चलनही जप्त करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात स्पष्टपणे लिहिले आहे की, तपासणी दरम्यान आरोपींची गॅझेट व मोबाईल फोनच्या डेटाच्या तपासणीत ड्रग्सची खरेदी आणि ड्रग्स वापरण्याचेही नमूद केले आहे. जप्त केलेली औषधे ताब्यात घेण्यात आली असून, रासायनिक तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आली आहेत (NCB arrest drugs peddler who was supplying drugs to sushant singh Rajput).

जप्त केलेली औषधे, आरोपींची निवेदने आणि आरोपींचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅट्स, बँकेचा तपशील, आर्थिक व्यवहार अशा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एकूण 11 हजार 700 चार्जशीट सादर करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. पुढील तपासानुसार लवकरच पुरवणी आरोपपत्रही दाखल केले जाईल. पुरवणी आरोपपत्रात बरीच मोठी नावे समोर येऊ शकतात.

रिया चक्रवर्तीच्या वकिलाची प्रतिक्रिया

रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, एनसीबीने रिया चक्रवर्ती यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. संपूर्ण एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग प्रकरणाचा खुलासा करण्यात मग्न आहे. चार्जशीट निरुपयोगी आहे, जी एनडीपीएस अधिनियम कलमांतर्गत नोंदवलेले अयोग्य पुरावे आणि विधानांच्या आधारे उभी राहिली आहे. तुफानी सिंग यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ती अनावश्यक आहे.

(NCB arrest drugs peddler who was supplying drugs to sushant singh Rajput)

हेही वाचा :

Kareena Kapoor | ‘महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला ‘छोट्या नवाबा’चा फोटो, पहा कसा दिसतो तैमुरचा भाऊ…

Published On - 3:27 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI