घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी पुन्हा अडकली विवाहबंधात

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 1:21 PM

प्रसिद्ध निर्मात्यासोबत लग्न, चार वर्षांनंतर घटस्फोट..., 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी पुन्हा गुपचूप अडकली विवाहबंधात; फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण

घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी पुन्हा अडकली विवाहबंधात
घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी पुन्हा अडकली विवाहबंधात

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने दुसरं लग्न केलं. ‘बधाई हो’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या आणि ‘पंचायत’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची मुलगी मसाबा हिने दुसरं लग्न केलं आहे. मसाबा गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सत्यदीप मिश्रा (satyadeep mishra) याला डेट करत आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (masaba gupta) हिने सत्यदीप मिश्रा याच्यासोबत विवाह केल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी सकाळी मसाबा आणि सत्यदीप विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये मसाबा नवरीच्या रुपात सुंदर दिसत आहे, तर दुसरीकडे सत्यदीप नवरदेवाच्या रुपात उठावदार दिसत आहे.

मसाबा गु्प्ता नेटफ्लिक्सवरील तिच्या ‘मसाबा मसाबा’ सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘मसाबा मसाबा’ सीरिजमध्ये सत्यदीप याने मसाबाच्या पतीची भूमिका साकारली आहे. आता फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रियल लाईफमध्ये देखील दोघे पती-पत्नी झाले आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर मसाबा आणि सत्यदीप यांनी लग्न केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

मसाबा गुप्ता हिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत मसाबाने भावना देखील व्यक्त केल्या आहेत. मसाबा आणि सत्यदीप यांची भेट ‘मसाबा मसाबा’ सीरिजच्या सेटवर झाली होती. भेट झाल्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर अखेर प्रेमात झालं. आता मसाबा आणि सत्यदीप यांनी लग्न केलं आहे. मसाबाच्या पोस्टवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

मसाबा आणि सत्यदीप यांचं दुसरं लग्न सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी मसाबा हिने मधु मंटेना यांच्यासोबत लग्न केलं. मधु मंटेना हे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आहेत. मधु मंटेना आणि मसाबा यांनी २०१५ साली लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. अखेर २०१९ मध्ये मधु मंटेना आणि मसाबा याचा घटस्फोट झाला.

मसाबा हिच्यासोबत सत्यदीप याचं देखील दुसरं लग्न आहे. मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी सत्यदीप याने अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्यासोबत लग्न केलं. दोघांनी २००९ मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांनी २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सत्यदीप याने आतापर्यंत ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘चिल्लर पार्टी’, ‘फोबिया’ आणि ‘विक्रम वेधा’ सिनेमांध्ये काम केलं होतं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI