रणबीर – आलिया यांच्या नात्यावर नीतू यांची नाराजी, सूनेच्या आईसोबत देखील होतात वाद

neetu kapoor : सूनेच्या आईसोबत देखील होतात नीतू कपूर यांचे वाद, रणबीर आणि आलियाच्या नात्याबद्दल देखील नीतू कपूर यांचा मोठा खुलासा... नीतू कपूर कायम नात राहा कपूर हिच्याबद्दल देखील बोलताना दिसतात.

रणबीर - आलिया यांच्या नात्यावर नीतू यांची नाराजी, सूनेच्या आईसोबत देखील होतात वाद
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:04 AM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. आता देखील अभिनेत्री नीतू कपूर यांनी मुलगा रणबीर कपूर आणि सून आलिया भट्ट यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे चाहत्यांना देखील आलिया – रणबीर यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी कळल्या आहेत. नीतू कपूर यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कुटुंबातील अनेक गोष्टींवर मोठा खुलासा केला.

शोमध्ये करण याने नीतू यांनी आलिया – रणबीर यांच्याबद्दल प्रश्न विचारला. ‘तूम्ही आलिया – रणबीर यांना यशस्वी नातं आणि वैवाहिक आयुष्यासाठी काय सल्ला देता…’ यावर नीतू कपूर म्हणाल्या, ‘मी दोघांनी काहीही सांगत नाही. सध्याचा काळ आणि वय पाहिल्यानंतर मी त्यांना सांगते, हवं ते करा… फक्त आनंदी राहा…’

‘प्रत्येक पिढी वेगळी असते. आम्ही ज्या टप्प्यातून गेलो आहोत, तेच मुलांनी करावा… अशी अपेक्षा आपण करु शकत नाही. त्यांना माहिती आहे, त्यांना काय करायचं आहे.’ असं नीतू कपूर म्हणाल्या. एवढंच नाही तर, आलिया भट्ट हिच्या आईसोबत सतत होत असलेल्या वादावर देखील नीतू कपूर यांनी मौन सोडलं आहे.

हे सुद्धा वाचा

आलिया हिच्या आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्याबद्दल नीतू कपूर म्हणाल्या, ‘सोनी आणि माझ्यात कायम प्रेमात वाद होत असतात. राहा हिने पहिल्यांदा रणबीर याला बाबा म्हणावं असा माझा हट्ट असतो आणि राहा हिने पहिल्यांदा आई म्हणावं असं सोनी यांचा हट्ट असतो. आम्ही राहा हिला आई-बाबा बोलायला शिकवत असतो…’

एवढंच नाही तर, राहा कोणाकडे पाहात आहे… यावरुन देखील आमच्यात वाद होत असतता… असं देखील नीतू कपूर म्हणाल्या… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीतू कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत असते. नीतू कपूर कायम नात राहा कपूर हिच्याबद्दल बोलताना दिसतात.

आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबिय आणि मित्र- परिवाराच्या उपस्थितीत दोघांना विवाह संपन्न झाला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

लग्नानंतर 6 नोव्हेंबर 2022 मध्ये आलिया हिने लेक राहा कपूर हिला जन्म दिला. नुकताच आलिया आणि रणबीर यांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला. सोशल मीडियावर राहा हिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.