AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Kakkar : महिन्याभरापुर्वी शुभमंगल, नेहा कक्करला आताच डोहाळे ? बघा फोटोचं वास्तव

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन ! (Neha Kakkar floating baby bump, Picture on social media )

Neha Kakkar : महिन्याभरापुर्वी शुभमंगल, नेहा कक्करला आताच डोहाळे ? बघा फोटोचं वास्तव
| Updated on: Dec 18, 2020 | 12:48 PM
Share

मुंबई : बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर नुकतीच रोहनप्रीत सिंहसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांच्या लग्नाला दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि आता नेहानं रोहनप्रीतसोबत बेबी फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर केला आहे.फोटो बघून नेहा आणि रोहनच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं दिसतंय. मात्र दोघांनीही फोटो शेअर करताना याचा उल्लेख केलेला नाही. (Neha Kakkar floating baby bump, Picture on social media )

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहा कक्करनं फोटो शेअर करत ‘खयाल रखया कर’असं कॅप्शन दिलं आहे. तर रोहनप्रीतनं या फोटोवर ‘आता तर जास्त काळजी घ्यावी लागणार’अशी कमेंट केली आहे. नेहाच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तर काहींनी नेहा खरच प्रेग्नेंट आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. खूप कमी वेळात हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

नेहा कक्करच्या या फोटोचं कॅप्शन पाहता हे तिच्या आगामी गाण्यांमधील बोल असल्याचं वाटत आहे. ‘नेहू दा व्याह’या गाण्याच्या वेळीसुद्धा नेहानं असा पब्लिसिटी स्टंट केला होता त्यामुळे आतासुद्धा असं काही तरी असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. या लग्नातील प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. लग्नानंतर नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केलं होतं. नेहाच्या स्वागतासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये होते.

नेहा आणि रोहन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट 2020 मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

संबंधित बातम्या 

Photo : नेहा कक्कर प्रेग्नंट, सोशल मीडियावरील फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव

Drugs Case | करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, 2019 मधील ‘त्या’ व्हिडिओवर उत्तर द्यावे लागणार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.