Video : बोल्ड आणि टोल्ड नेहा पेंडसे, खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला गिफ्ट!

बर्‍याच मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिसणारी अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) नुकताच टीव्ही इंडस्ट्रीमध्येही कमबॅक केले आहे.

Video : बोल्ड आणि टोल्ड नेहा पेंडसे, खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला गिफ्ट!

मुंबई : बर्‍याच मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिसणारी अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) नुकताच टीव्ही इंडस्ट्रीमध्येही कमबॅक केले आहे. सध्या नेहा ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत काम करत आहे. मात्र, सध्या नेहा पेंडसेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालताना दिसत आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये नेहा पतीसोबत दिसत आहे. (Neha Pendse shares a special video for Valentine and gives it as a gift to her husband)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

या व्हिडिओमध्ये ती पती शार्दुल सिंह बायससोबत खास पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा माझा पती … हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी …या व्हिडीओमध्ये नेहा पतीला किस करताना दिसत आहे. नेहाचा हा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

नेहाने आतापर्यंत ‘पडोसन’, ‘हसरते’, ‘मीठी मीठी बाते’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘फॅमिली टाइल विद कपिल शर्मा’ मध्ये काम केले आहे तर नेहाने बॉलिवूड चित्रपट ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘दाग: द फायर’, ‘दीवाने’, ‘तुमसे अच्छा कौन है आणि ‘देवदास’ यासारख्या चित्रपटामध्ये नेहाने भूमिका केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत नेहा पेंडसे सध्या अनिता भाभीची भूमिका साकारत आहे. सौम्या टंडन गेल्यापासून अनिता भाभीची भूमिका चाहते मिस करत होते. नेहाची ‘भाभीजी घर पर है’या मालिकेत जबरदस्त एन्ट्री केली आहे.

संबंधित बातम्या : 

गोड बातमी: करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस, इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज

(Neha Pendse shares a special video for Valentine and gives it as a gift to her husband)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI