पाण्याच्या टाकीत 21 वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, भयानक शेवटचा व्हिडीओ

त्या बदनाम हॉटेलमध्ये गेली आणि परत आलीच नाही... पाण्याच्या टाकीत आढळला 21 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह... 12 वर्षांनंतर देखील मृत्य एक रहस्य? भयानक होता शेवटचा व्हिडीओ

पाण्याच्या टाकीत 21 वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, भयानक शेवटचा व्हिडीओ
फाईल फोटो
| Updated on: Jul 19, 2025 | 2:07 PM

काही खऱ्या घटना अशा देखील असतात, ज्यामुळे मन पूर्णपणे विचलित होतं. अशात आपण विचार करु लागतो असं का झालं. यामागे काही तरी मोठं कारण असेल, नाही तर कोणी काही कारण नसताना असं का करेल? आपण असा विचार करत राहतो आणि जगातील कोणत्यातरी कोपऱ्यात एक धक्कादायक घटना घडत असते. ज्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हा पुन्हा त्याच दिशेने विचार करु लागता. अशीच एक घटना 12 वर्षांपूर्वी घडली होती. ज्यामुळे पूर्ण जग हादरलं.

साध्या ज्या प्रकरणाची सुरु आहे, ती सत्य घटनेवर आधारित एक डॉक्यूमेंट्री सीरीज आहे. ज्यामध्ये एक मुलगी आणि एक हॉटेल मधील एका सत्य घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही एक अशी घटना आहे, ज्यामुळे तुमच्या आगाला काटा येईल… कथेतील मुलगी अचानक गायब होते. मुलगी भेटत असल्यामुळे शोधाशोध सुरु होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 12 वर्षांनंतरही त्या मुलीचा मृत्यू कसा झाला हे कळलेलं नाही. कोणीतरी तिचा खून केला की ती आत्महत्या होती?

सांगायचं झालं तर, 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या Crime Scene: The Vanishing at the Cecil Hotel क्राईम सीरिजबद्दल चर्चा सुरु आहे. सीरिज 2013 मध्ये घडलेल्या एका भयानक सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये 21 वर्षीय कॅनेडियन विद्यार्थिनी एलिसा लॅम गायब होते.

मुलगी लॉस एंजेलिसमध्ये एकटीच आली होती आणि तिथल्या सेसिल हॉटेलमध्ये राहत होती, जे एक कुप्रसिद्ध हॉटेल होतं आणि काही दिवसांनी ती अचानक बेपत्ता झाली. तिचं सर्व सामान खोलीत होतं, पण ती स्वतः कुठेच सापडली नाही.

एलिसा लाम बेपत्ता झाल्यानंतर, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्या व्हिडिओमध्ये एलिसाचे वर्तन थोडं विचित्र वाटत होतं, जे पाहून लोक भूत, खून आणि कट अशा कथा बनवू लागले. अनेक यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचे स्वतःचे सिद्धांत सांगितले.

पण हळूहळू हे उघड झालं की हे प्रकरण खरोखर मानसिक आरोग्याशी संबंधित आहे, ज्याकडे लोकं दुर्लक्ष करत होते. तथापि, हे प्रकरण कधीच उलगडलं नाही.