AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor |’सर्वांत उद्धट सेलिब्रिटी’; चाहतीसोबतच्या वागणुकीमुळे करीना कपूरवर भडकले नेटकरी

याआधीही करीनाच्या वागणुकीबद्दल एका मराठी दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत आली होती. इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि करीना कपूर हे एकाच विमानातू प्रवास करत होते. नारायण मूर्तींनी सांगितलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी करीनावर टीका केली होती.

Kareena Kapoor |'सर्वांत उद्धट सेलिब्रिटी'; चाहतीसोबतच्या वागणुकीमुळे करीना कपूरवर भडकले नेटकरी
Kareena Kapoor KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2023 | 9:56 AM
Share

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेषकरून चाहत्यांसोबतच्या वागणुकीमुळे करीना अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी करीनावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबई एअरपोर्टवर एका चाहतीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतेय. करीनाची वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.

करीनाला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर पापाराझींनी पाहिलं आणि तिचा व्हिडीओ शूट केला. एअरपोर्टमधून बाहेर पडताच तिच्या मागे एक चाहती सेल्फी काढण्यासाठी आली. त्या चाहतीने तिच्या हातात फोन धरला होता आणि ती करीनाच्या मागे मागे जात होती. तिने एकदा-दोनदा करीनाला हाकसुद्धा मारली. मात्र करीनाने तिच्याकडे वळूनही पाहिलं नाही. अखेर काही वेळानंतर ती चाहती मागे निघून गेली.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी करीनावर प्रचंड राग व्यक्त केला आहे. ‘हा खूपच उद्धटपणा आहे. तिला फक्त सेल्फी काढायची होती. पण या बॉलिवूड कलाकारांना एवढा कसला ॲटिट्यूड आहे हे मला कधीच समजलं नाही. ते फक्त चित्रपटात चांगल्या व्यक्तीची भूमिका साकारतात, पण त्यांची रिॲलिटी ही आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशा लोकांमागे सेल्फीसाठी धावणं हा खूपच मूर्खपणा आहे. ही लोकं खरे हिरो नाहीत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सर्वांत उद्धट सेलिब्रिटी’ अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी करीनाला टोला लगावला. अशा सेलिब्रिटींना फार महत्त्व देऊ नका, असा सल्ला काहींनी चाहत्यांना दिला आहे.

पहा व्हिडीओ

याआधीही करीनाच्या वागणुकीबद्दल एका मराठी दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत आली होती. इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि करीना कपूर हे एकाच विमानातू प्रवास करत होते. नारायण मूर्तींनी सांगितलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी करीनावर टीका केली होती. ‘नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला. ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाइटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाइटमधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते. पण काही चाहते करीना कपूरजवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते. तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करीनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला’, अशी पोस्ट टिळेकरांनी लिहिली होती.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.