Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फ्री हिट दणका’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'फ्री हिट दणका'च्या टीमनं हा सिनेमा 16 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.(New Marathi Movie, Free hit Danaka)

  • Updated On - 4:20 pm, Sat, 6 February 21
Marathi Movie :  मराठी चित्रपटसृष्टीत 'फ्री हिट दणका', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : कोरोनानंतर तब्बल 11 महिन्यांनी चित्रपटगृह पूर्णक्षमतेनं सुरू करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. आता चित्रपटगृह सुरू होणार या बातमीनंच प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीमध्येही नवा जोश संचारला आहे. निर्माते, दिग्दर्शकांसोबत सर्वच जणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. तर आता अनेक मराठी चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.

यातच मराठी सिनेमा ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करत ‘फ्री हिट दणका’च्या टीमनं हा सिनेमा 16 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रेमाच्या महिन्याचं औचित्य साधत या टीमनं चित्रपटाच्या नायकाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस. नया अभिनेत्रीसोबत नायक म्हणून फेंड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे या चित्रपटात झळकणार आहे. फेंड्री नंतर बऱ्याच दिवसांनी सोमनाथ अभिनय करताना दिसणार आहे. सोमनाथचा या सिनेमातला लूक पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवती भवती फिरणारा तर नाहीना? आणि चित्रपटाच्या नावातूनही या चित्रपटाचा क्रिकेटशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील. मात्र सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे.

एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे, आणि सुनिल मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.  सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI