AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्या हैं सचिन मैं?’, पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर हिच्या ‘लव्हस्टोरी’वर नवं गाणं; पाहा व्हिडीओ

पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीणा यांच्या 'लव्हस्टोरी'वर नवं गाणं; सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकुळ... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

'क्या हैं सचिन मैं?', पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर हिच्या 'लव्हस्टोरी'वर नवं गाणं; पाहा व्हिडीओ
| Updated on: Aug 05, 2023 | 1:50 PM
Share

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या सर्वत्र पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीणा यांच्या ‘लव्हस्टोरी’वर साकारण्यात आलेल्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. दरम्यान सचिन याच्या शेजारी राहत असलेल्या महिलीने दोघांच्या ‘लव्हस्टोरी’वर वक्तव्य केलं आहे. त्या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सचिन – सीमा यांची लव्हस्टोरी आणि शेजारी राहत असलेल्या वक्तव्यावर यशराज मुखाते याने गाणं तयार केलं आहे.

यशराज मुखाते याने तयार केलेलं गाणं ऐकून तुमच्या देखील हसून – हसून पोटात दुखेल. सोशल मीडियावर सध्या गाणं तुफान व्हायरल होत आहे. सचिन आणि सीमा यांच्या ‘लव्हस्टोरी’वर गाणं सोशल मीडियावर पोस्ट करत यशराज मुखाते याने कॅप्शनमध्ये ‘लप्पू सा सचिन…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र गाण्याची चर्चा रंगत आहे.

यशराज मुखाटे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यावर तासाभरातच तो व्हायरल झाला. नेटकरी देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ऑनलाई पबजी गेममुळे सीमा आणि सचिन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरु झाली. प्रेमासाठी सीमा चार मुलांसोबत पाकिस्तानातून भरतात आली आहे.

सचिन याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचं वक्तव्य

व्हिडीओमध्ये सचिन याच्या शेजारी राहणारी महिला म्हणते, ‘प्रेमासाठी काही कारण हवं असतं… साधी गोष्ट आहे… प्रेमासाठी एक माणूस हवा असतो… तो काय मुलगा सडपातळ…जोराचा वारा आल्यानंतर कुठे जाईल कळणार देखील नाही… शोधल्यावर देखील भेटणार नाही…’ महिलेचं वक्तव्य देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, सीमा हिने भारताचं नागरिकत्व देखील मागितलं आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर हिला आता भारताचं नागरिकत्व हवं आहे. सतत वेगवेगळ्या कारणांमुळे सीमा हिच्या चर्चा रंगत आहेत.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.