Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला…

कलर्स टीव्हीचा शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये रोज घरात काहीतरी नवीन घडतं आहे.

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला...

मुंबई : कलर्स टीव्हीचा शो ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये रोज घरात काहीतरी नवीन घडतं आहे. मंगळवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये घरातील सदस्य दोन टिममध्ये विभागले गेले आहे. एका टिममध्ये निक्की तांबोळी, अर्शी खान, राहुल वैद्य, अली गोनी आणि सोनाली फोगट तर दुसऱ्या टिममध्ये अभिनव शुक्ला, रुबीना दिलैक, राखी सावंत, देवोलीना आणि विकास हे आहेत. मात्र, यावेळी निक्की टास्कमध्ये स्वत: च्या टिमला विजयी करण्यापेक्षा ती रूबीनाच्या टिमला मदत करते. (New task in Bigg Boss’s house)

राहुल, टास्क दरम्यान रुबीना आणि अभिनवच्या नात्याबद्दल चुकीचे बोलतो त्यानंतर राहुलवर रूबीना भडकते आणि दोघांमध्ये जोरदार भांडणे होतात. बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे टास्कचे लॉकआऊट नाव आहे. बिग बॉसमध्ये राखी पुन्हा सर्वांचे मनोरंजन करण्यास सुरवात करते. ती सर्वांना तिचे पोट दाखवते आणि म्हणते, मी पातळ झाले आहे, मला खायला द्या.

बिग बॉस काही दिवसांपूर्वी घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. ज्यामध्ये ते कोणत्या सदस्याला त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी किती वेळ दिला जाईल हे ठरवणार होते. एजाजला भेटण्यासाठी त्याचा भाऊ येतो तर राहुल वैद्य आणि निक्कीला भेटायला त्यांची आई येते. अभिनव आणि अलीला भेटण्यासाठी त्यांच्या बहीणी येणार येतात. यावेळी घरातील सर्वच सदस्य खूप भावनिक झालेले दिसत होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss | रुबीना आणि अभिनव यांच्यात वाद!

Bigg Boss 14 | बिग बॉसने दिले घरातील सदस्यांना ‘सरप्राईज’

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनणार राखी सावंत?

(New task in Bigg Boss’s house)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI