AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 global summit 2025 : ‘त्यांना वाटतं आपण बॉलिवूडपेक्षा मोठे झालोत, पण…’, सुनील शेट्टीचं परखड मत

News9 global summit 2025 : सुपरस्टार सुनील शेट्टीने न्यूज9 ग्लोबल समिट 2025 च्या खास सेगमेंट द सिनेमॅटिक इन्वेस्टरमध्ये सहभाग घेतला. वयाच्या 64 व्या वर्षी Action सिनेमे करण्याबद्दल सुनील शेट्टी बोलला. याचवेळी त्याने बॉलिवूड आणि साऊथमध्ये कोणता सिनेमा मोठा? त्या बद्दलही सांगितलं.

News9 global summit 2025 : 'त्यांना वाटतं आपण बॉलिवूडपेक्षा मोठे झालोत, पण...', सुनील शेट्टीचं परखड मत
suniel shetty
| Updated on: Jun 20, 2025 | 3:15 PM
Share

न्यूज 9 ग्लोबल समिट 2025 मध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. यंदा यूएईमध्ये ही समिट होत आहे. त्यात चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले आहेत. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये दीर्घकाळापासून काम करणारा सुनील शेट्टी सुद्धा या ग्रँड समिटमध्ये सहभागी झाला होता. या समिटच्या ‘द सिनेमॅटिक इन्वेस्टर’ सेगमेंटमध्ये आपल्या जीवनातील अनेक पैलूंबद्दल तो बोलला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात एक Action हिरो म्हणून केली होती. सुनील शेट्टी आपल्या करिअरमध्ये Action हिरो म्हणून लोकप्रिय होता. वयाची साठी ओलांडल्यानंतर Action चित्रपटात काम करण्याबद्दल तो बोलला.

अभिनेता सुनील शेट्टी आता 64 वर्षांचा आहे. त्याने नेहमी आपली फिटनेस आणि आरोग्यावर लक्ष दिलं आहे. सुनील त्याच्या हेल्थच्या बाबतीत कधीही तडजोड करत नाही. म्हणूनच त्याला Action हिरोचा टॅग मिळाला. म्हणून त्याला पाहिल्यानंतर सुनील शेट्टी आजही Action सीन्स करु शकतो असं प्रेक्षकांना वाटतं. त्याला बॉडी डबलची गरज पडत नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, “एक गोष्ट खरी आहे, आता मी 64 वर्षांचा झालोय, Action सीन्स करण्यात मलाही अडचणी येतात”

मला हिंदी सिनेमा दुसऱ्या सिनेमांचा बाप वाटतो

बॉलिवूडमध्ये सध्या जी स्थिती आहे, ती तुम्हाला पुढे जाताना दिसतेय की, घसरण होताना पाहता? त्यावर सुनील शेट्टी बोलला की, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत. आपण कुठे आहोत, हे मी सांगू शकत नाही. कुठल्याही इंडस्ट्रीचा चित्रपट चालला, तर त्यांना असं वाटतं की, ते बॉलिवूडपेक्षा मोठे झालेत. पण प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, मला हिंदी सिनेमा दुसऱ्या सिनेमांचा बाप वाटतो”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.