AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Bobby Deol Love Story: 'बॉबी देओल सोबत असताना सतत मनात भीती असायची कारण...', अभिनेत्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडून मोठा खुलासा... अनेकांना माहिती देखील प्रकरण, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची सतत रंगलेली असते चर्चा...

बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच..., प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
| Updated on: Nov 17, 2024 | 1:39 PM
Share

Bobby Deol Love Story: बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अनेक सेलिब्रिटी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येतात. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत होता. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबी देओल आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी एकमेकांना तब्बल 5 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नपर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिनेते धर्मेंद्र यांच्यामुळे बॉबी – नीलम यांनी स्वतःचे मार्ग वेगळे केले.. असं देखील अनेकदा समोर आलं.

रिपोर्टनुसार, एक अभिनेत्री देओल कुटुंबाची सून व्हावी अशी धर्मेंद्र यांची कधीच इच्छा नव्हती…. असं देखील सांगण्यात येतं. पण दोघांच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्री पूजा भट्ट हिला देखील जबाबदार ठरवण्यात आलं. बॉबी देओल आणि पूजा भट्ट यांच्यातील नात्यामुळे नीलमसोबत अभिनेत्याचं ब्रेकअप झालं… असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.

View this post on Instagram

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

पण ब्रेकअपसाठी नीलम हिने कोणालाच जबाबदार ठरवलं नाही. एका मुलाखतीत नीलम हिने बॉबीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी आणि बॉबी, पूजा भट्ट हिच्यामुळे विभक्त झालो नाही. मला अचानक वाटू लागलं की, बॉबीसोबत लग्न झाल्यानंतर मी आयुष्यात कधीच आनंदी राहू शकली नसती. हे समजण्यासाठी मला 5 वर्ष लागली…’

‘मला एका स्टारची पत्नी म्हणून स्वतःचं करियर संपवायचं नव्हतं. बॉबी सोबत राहिल्यानंतर काय होईल याची सतत भीती वाटायची. नंतर काही वाईट होईल याचा विचार देखील मी करू शकत नव्हती. बॉबी देओल याच्या करिअर बद्दल देखील मला खात्री नव्हती.’ असं देखील नीलम म्हणाली होती. आता बॉबी देओल आणि नीलम देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. बॉबी देओल याने इंटिरियर डिझायनर तान्या हिच्यासोबत लग्न केलं. तर नीलम कोठारी हिने पहिल्या घटस्फोटनंतर अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान