Govinda | तब्बल 1000 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात गोविंदाची होणार चौकशी

तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात अभिनेता गोविंदाची चौकशी होणार आहे. गोविंदाने संबंधित कंपनीच्या जाहिरातीत सहभाग घेतला होता, म्हणून त्याच्याही अडचणी वाढणार आहेत.

Govinda | तब्बल 1000 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात गोविंदाची होणार चौकशी
GovindaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 11:14 AM

भुवनेश्वर | 14 सप्टेंबर 2023 : ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची चौकशी होणार आहे. एक हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे. क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. कंपनीने दोन लाख लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओमध्ये या कंपनीचं समर्थन केल्याचा आरोप आहे. सोलर टेक्नो अलायन्स (STA- Token) हे अनेक देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असून क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या ऑनलाइन पॉन्झी योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशातील दोन लाखांहून अधिक लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले, असंही ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं. या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडीओंमध्ये अभिनेता गोविंदाने त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार आहे.

“आम्ही गोविंदाच्या चौकशीसाठी लवकरच मुंबईला एक टीम पाठवू. त्याने जुलै महिन्यात गोव्यात पार पडलेल्या या कंपनीच्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे काही व्हिडीओमध्ये त्यांनी कंपनीची प्रसिद्धी केली होती”, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर जनरल जे. एन. पंकज यांनी दिली. “सध्या तरी गोविंदा याप्रकरणी संशियत किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका काय होती हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. त्याची भूमिका फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठीच मर्यादित होती असं निष्पन्न झाल्यास आम्ही त्याला या प्रकरणात साक्षीदार बनवू”, असंही ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संबंधित कंपनीने भद्रक, किओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वर या ठिकाणाहून तब्बल दहा हजार लोकांकडून 30 कोटी रुपये गोळा केले होते. इतकंच नव्हे तर त्यांनी बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणा, दिल्ली, झारखंड, आसाम आणि मध्यप्रदेश इथल्या गुंतवणूकदारांकडूनही लाखो रुपयांच्या ठेवीसुद्धा घेतल्या होत्या.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.