अमीश त्रिपाठी यांची ‘रामचंद्र’ मालिका, ‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ आता ऑडीओ बुक स्वरुपात!

वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या रामायण महाकाव्यचा आधार घेत 'राम'- इक्ष्वाकूचे वंशज', 'सीता' - मिथिलेची योध्दा', 'रावण' - आर्यावर्ताचा शत्रू' या तीन महाकाय कादंबऱ्यांची निर्मिती अमीश त्रिपाठी यांनी ‘रामचंद्र’ या महाकाय मालिकेद्वारे केली आहे.

अमीश त्रिपाठी यांची ‘रामचंद्र’ मालिका, ‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ आता ऑडीओ बुक स्वरुपात!
Ameesh Tripathi
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:23 PM

मुंबई : वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या रामायण महाकाव्यचा आधार घेत ‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’, ‘सीता’ – मिथिलेची योध्दा’, ‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’ या तीन महाकाय कादंबऱ्यांची निर्मिती अमीश त्रिपाठी यांनी ‘रामचंद्र’ या महाकाय मालिकेद्वारे केली आहे. ‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ या त्यांच्या तिन्ही प्रदीर्घ कादंबऱ्यांची मराठी ऑडिओ सिरीज खास स्टोरीटेल ओरिजनलवर रसिकांना आता ऐकायला मिळणार आहे. ‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’ करिता अभिनेता स्वप्नील राजशेखर, ‘सीता’ – मिथिलेची योध्दा’करिता अभिनेत्री केतकी थत्ते तर ‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’ करिता अभिनेते तुषार दळवी यांनी आपल्या बहारदार आवाजातून अस्खलित उभ्या केल्या आहेत.

इक्ष्वाकू कुलातील प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरील रामायण हा हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. भारतीय पुराणकथा, दंतकथा, लोककथा, देव, धर्म, संस्कृती, इतिहास, असुर आणि नायक इत्यादींच्या माध्यमातून त्यात आजच्या विज्ञान युगाची सांगड घालत लोकप्रिय कथा कादंबऱ्यांची नवं निर्मिती लेखक अमिश त्रिपाठी यांनी केली आहे. त्यांच्या या लिखाणाला संपूर्ण जगभरात प्रचंड लोकाश्रय मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांवरील या प्रदीर्घ मालिकेने विक्रीचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

माता सीतेचं नवं रूप

स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या या उपक्रमाविषयी बोलताना लेखक अमिश त्रिपाठी म्हणतात. “सीतेचे आज जे रूप आपल्यासमोर आहे ते 1980 च्या दशकातील टीव्ही मालिकांवर आधारित आहे, ज्या मुख्यतः तुलसीदासांच्या रामचरित मानसवर आधारित आहेत. मात्र सीता: वॉरियर ऑफ मिथिला या पुस्तकात सीतेच्या जन्मापासून ते रावणाने तिचे अपहरण होईपर्यंतचा कालखंड दाखविला आहे. सीता प्रथमतः ती एक मुलगी, एक पराक्रमी स्त्री, तसेच आदर्श पत्नीच्या रूपात असणार आहे.

काय आहे ही मालिका?

‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’, या भागातील मालिकेत फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानचे परिणाम समाजात खोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा- रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनाना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचे सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र.

‘सीता’ – मिथिलेची योध्दा’

‘सीता’ – मिथिलेची योध्दा’, या मालिकेत असंतोष, विभाजन आदींनी भारत ग्रस्त आहे. लोक भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचा आणि राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. बाहेरचं जग या विभाजनाचा आणि गोंधळाचा फायदा घेतं. लंकेचा राक्षस रावण दिवसेंदिवस शक्तिशाली बनतो आहे. दुर्देवी सप्त सिंधू परिसरात तो आपले दात खोलवर रूतवत आहे. अशावेळी गरज असलेली योद्धा आहे ती. आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती. ती धर्मांचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल… अमीश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या रामचंद्र मालिकेतील ही कादंबरी तितकीच रोमहर्षक…!

‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’

‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’मध्ये रावण मानवांमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, विजय मिळवण्यास, लुटपाट करण्यास, आणि आपला हक्क समजत असलेल्या महानतेसाठी दृढ आहे. तो विरोधाभास, क्रूर हिंसा आणि अफाट शहाणपणाने भरलेला माणूस आहे आणि जो व्यक्ती प्रति दानाची अपेक्षा ना करता प्रेम करतो आणि विना पश्चाताप हत्या करू शकतो. रामचंद्र मालिकेतील या तिसर्‍या पुस्तकात अमीशने लंकेचा राजा रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे की तो परिस्थितीचा बळी पडला आहे? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला स्टोरीटेलची ही संपूर्ण सिरीज ऐकावी लागेल.

हेही वाचा :

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.