Maharani 2: ‘महारानी 2’ सीरिजमध्ये मराठमोळ्या अनुजा साठेची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

| Updated on: Jul 30, 2022 | 8:22 AM

प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती फिरणाऱ्या या सीरिजच्‍या आधीच्या पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्‍सुकता निर्माण केली.

Maharani 2: महारानी 2 सीरिजमध्ये मराठमोळ्या अनुजा साठेची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Maharani 2: 'महारानी 2' सीरिजमध्ये मराठमोळ्या अनुजा साठेची एण्ट्री
Image Credit source: Instagram
Follow us on

काही कथा प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात आणि सीरिजच्या प्रत्येक एपिसोडनुसार अधिकाधिक उत्‍सुकता निर्माण करतात. अशीच एक कथा आहे सोनीलिव्‍ह (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘महारानी’ (Maharani) या सीरिजची आहे. या सीरिजने आपल्या कथानकाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती फिरणाऱ्या या सीरिजच्‍या आधीच्या पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्‍सुकता निर्माण केली. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून या सीरिजचा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमधील प्रतिभावान कलाकारांमध्‍ये अनुजा साठेचाही (Anuja Sathe) समावेश करण्‍यात आला आहे.

या सीरिजमध्ये राजकीय उमेदवाराच्‍या भूमिकेत प्रवेश करत अनुजा साठे किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे. किर्ती सिंग ही भीमा भारतीची (सोहम शाह) विश्‍वासू बनते. आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना अनुजा म्‍हणाली, ”मी भूमिकांसंदर्भात नेहमीच नशीबवान राहिली आहे. हाच ट्रेण्‍ड कायम राखत प्रेक्षकांना मी या सीरिजमध्‍ये नवीन अंदाजात पाहायला मिळणार आहे. मी वास्‍तविक जीवनात जशी आहे त्‍यापेक्षा किर्ती पूर्णत: विरूद्ध आहे. म्‍हणून अभिनेत्री म्‍हणून माझ्यासाठी हा आव्हानात्मक आणि समाधानकारक अनुभव होता. मला माझ्या भूमिकेचे विविध पैलू साकारताना स्‍वत:मध्‍ये बदल करावे लागले. सर्व कलाकार व टीम अत्‍यंत सहाय्यक राहिली आहे आणि मी त्‍या सर्वांसोबत काम करताना खूप धमाल केली.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

‘महारानी 2’चे दिग्‍दर्शन रविंद्र गौतम यांनी केलं आहे, तर सुभाष कपूर व नंदन सिंग हे या सीरिजचे शोरनर्स व लेखक आहेत. सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत हुमा कुरेशी असून सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, इनाम उल हक, दिब्‍येंदू भट्टाचार्य, कनी कस्‍तुरी, प्रमोद पाठक आणि विनीत कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.