मुंबई : हातात खरी बंदूक घेऊन चालवणे, किती भीतीदायक असू शकते, याची आपल्याला तितकीशी कल्पना नाही. अनेक देशभक्ती किंवा गॅंगवॉरवर आधारित चित्रपटांमध्ये आपण गुंडांना किंवा दहशतवाद्यांना अगदी सहजरित्या गोळीबार करताना, रक्तपात घडवताना पाहातो. ते पाहाण्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो की, ते सर्व खोटे आहे हेही आपण पूर्णपणे विसरतो. इतक्या कौशल्याने हे चित्रित केले जाते. एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या ‘एक थी बेगम २’ या वेबसिरीजची (Ek Thi Begum) नायिका अनुजा साठे (Anuja Sathe) हिने पडद्यावर अतिशय सहजरित्या बंदूक हाताळली आहे. अर्थात त्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले.