Binge Watch : ‘शिद्दत’ ते ‘ब्रेक पॉईंट’, पाहा या आठवड्यात OTTवर मनोरंजनाच्या मेजवानीत काय काय असणार?

या व्यस्त जीवनात, चित्रपट चाहत्यांसाठी मनोरंजनासाठी विशेष आधार बनले आहेत. दरवेळी प्रमाणे या आठवड्यात सुद्धा मनोरंजनांनी भरलेल्या अनेक सुंदर कथा रसिकांसमोर सादर केल्या जातील. या आठवड्यातही प्रेक्षकांसाठी काहीतरी खास OTT वर रिलीज होणार आहे.

Binge Watch : ‘शिद्दत’ ते ‘ब्रेक पॉईंट’, पाहा या आठवड्यात OTTवर मनोरंजनाच्या मेजवानीत काय काय असणार?
OTT Release

मुंबई : या व्यस्त जीवनात, चित्रपट चाहत्यांसाठी मनोरंजनासाठी विशेष आधार बनले आहेत. दरवेळी प्रमाणे या आठवड्यात सुद्धा मनोरंजनांनी भरलेल्या अनेक सुंदर कथा रसिकांसमोर सादर केल्या जातील. या आठवड्यातही प्रेक्षकांसाठी काहीतरी खास OTT वर रिलीज होणार आहे.

या आठवड्यात तुम्हाला सस्पेन्स, कॉमेडी, थ्रिल, ड्रामा सर्व पाहायला मिळेल. यावेळी मनोरंजनाचा खजिना 1 ऑक्टोबरपासून चाहत्यांसमोर उघडणार आहे. जाणून घेऊया कोणते चित्रपट रिलीज केले जाणार आहेत…

शिद्द्त

सनी कौशल, राधिका मदन, मोहित रैना आणि डायना पेंटी स्टारर ‘शिद्दत’ चित्रपट एक रोमँटिक कथा आहे. हा चित्रपट वेडेपणा, उत्कटता आणि वेदना अशा संमिश्र भावना दाखवतो. हा चित्रपट शुक्रवार, 1 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

बिंगो हेल

‘बिंगो हेल’ अॅमेझॉन प्राइमवर 1 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन गिगी शौल गुरेरो यांनी केले आहे. या चित्रपटात एल.स्कॉट कॅल्डवेल, एड्रियाना बॅराझा आणि जोशुआ कालेब जॉन्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ब्रिटनी वर्सेस स्पीयर्स

ब्रिटनी वर्सेस स्पीयर्स 29 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहे. यात पत्रकार जेनी एलिसेयू आणि चित्रपट निर्माते एरिन ली कार यांच्या विशेष मुलाखती आणि गोपनीय पुराव्यांद्वारे ब्रिटनी स्पीयर्सच्या स्वातंत्र्यासाठीची लढाई दिसणार आहे.

साउंड्स लाईक लव्ह

29 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर साउंड्स लाईक लव्ह प्रीमियर होईल. हे तुम्हाला दाखवेल की फॅशनकडे कसे पाहायचे. ब्रेकअपला सामोरे जाण्यासाठी जिमेना आणि अॅड्रियाना या आपल्या जिवलग मित्रांकडे कशा वळतात, आणि ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री स्वतःला कशी हाताळतात हे दाखवले जाईल. हा चित्रपटही रोमँटिक आहे.

ब्लॅक अॅज नाईट

हा चित्रपट Amazon प्राइमवर 1 ऑक्टोबर रोजी रिलीज केला जाईल. ब्लॅक अॅज नाईटमध्ये 15 वर्षीय शॉना आहे, जिच्या आईला व्हँपायरने मारले आहे. ती तिच्या तीन मैत्रिणींसोबत राहते आणि आयुष्य जगते. हा चित्रपट आयुष्यातील चढ-उतारांनी भरलेला आहे.

ब्रेक पॉईंट

‘ब्रेक पॉईंट’ 1 ऑक्टोबर रोजी Zee5 वर प्रदर्शित केला जाईल. यामध्ये महेश भूपती आणि लिएंडर पेसची जोडी दाखवली जाईल. वर्ष 1999 मध्ये जगातील नंबर वन टेनिस जोडी होती. पण, शिखरावर पोहोचल्यावर असे काही घडले की, ही जोडी तुटली. त्यांच्या मैत्रीची आणि दुरावाची कारणे झी 5 च्या डॉक्युड्रामा मालिका ब्रेक पॉइंटद्वारे समोर आणली जातील.

मेडे

नेटफ्लिक्सवर 1 ऑक्टोबर रोजी ‘मेडे’ फिल्म देखील प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका गायिका आईचा प्रवास सादर करणार आहे. एक आई आपल्या मुलीला सर्व समस्यांना कसे सामोरे जायला शिकवते हे चित्रपटात दाखवले जाईल. चित्रपट भावनांनी भरलेला आहे.

द गिल्टी

1 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर ‘द गिल्टी’ प्रदर्शित केला जाईल. पण, जर तुम्ही बऱ्याच काळापासून हॉलिवूडचा थ्रिलर चित्रपट शोधत असाल, तर तुमचा शोध आता संपला आहे. हा चित्रपट अपहरणाशी संबंधित आहे.

हेही वाचा :

Nikki Tamboli : बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीने स्टायलिश साडीत केला कहर, बोल्ड लूकनं चाहते झाले वेडे

Tu Saubhagyavati Ho | ‘आपली साथ कायम राहील…’, ‘तू सौभाग्यवती हो’ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर हरीश दुधाडेची भावूक पोस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI