Tu Saubhagyavati Ho | ‘आपली साथ कायम राहील…’, ‘तू सौभाग्यवती हो’ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर हरीश दुधाडेची भावूक पोस्ट!

नशिबाच्या अनोख्या खेळीने एकत्र आलेल्या ऐश्वर्या आणि सुर्यभान यांच्या या नात्याची गोष्ट ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेत दिसली. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी या मालिकेने मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला होता. मात्र, काही कारणास्तव या मालिकेने प्प्रेक्षकांचा फार लवकर निरोप घेतला .

Tu Saubhagyavati Ho | ‘आपली साथ कायम राहील...’, ‘तू सौभाग्यवती हो’ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर हरीश दुधाडेची भावूक पोस्ट!
Tu Saubhagyavati Ho team

मुंबई : नशिबाच्या अनोख्या खेळीने एकत्र आलेल्या ऐश्वर्या आणि सुर्यभान यांच्या या नात्याची गोष्ट ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेत दिसली. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी या मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला होता. मात्र, काही कारणास्तव या मालिकेने प्प्रेक्षकांचा फार लवकर निरोप घेतला . आपली आवडती मालिका आता पाहता येणार नसल्याने प्रेक्षकांचाही काहीसा हिरमोडच झाला. मात्र, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर, मालिकेत ‘सूर्यभान’ साकारणाऱ्या अभिनेता हरीश दुधाडेची (Harish Dudhade) पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अभिनेता हरीश दुधाडे याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्त लिहिली आहे. ही पोस्ट वाचून त्याचे चाहते देखील इमोशनल झाले. ‘आपली साथ कायम राहील…’, असं म्हणत ‘सूर्यभान’ने आपल्या चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

पाहा पोस्ट :

काय म्हणाला अभिनेता?

‘नमस्कार, भरलेल्या अंत:करणाने आणि भारलेली कलाकृती तुम्हा रसीकप्रेक्षकांच्या चरणी समर्पित करत, मी सुर्यभान तुमचा निरोप घेतो. तुम्ही केलेलं हे प्रेम मनाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात अत्तराच्या सुगंधीत कुपी सारखं कायम जवळ राहील. माझ्यासोबत तुम्ही हसलात रडलात, माझ्यावर चिडलात पण तरीही माझ्यातच रमलात, तुमच्या या निस्वार्थ सोबतीला नमन करतो……. आज निरोप घेत असलो तरी आपली साथ अशीच कायम राहील … विषय कट..

– सुर्यभानराव जाधव’

अशी खास आभार मानणारी कॅप्शन लिहित हरीशने मालिकेच्या सगळ्या कलाकारांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

शशांक केतकरच्या बहिणीची मालिका विश्वात एंट्री

दीक्षा केतकरची मुख्य भूमिका असलेली ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर रुजू झाली होती. दीक्षाची ही पहिलीच मालिका होती. दीक्षाबरोबरच या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडे, दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही होते. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्री दीक्षा केतकर (Deeksha Ketkar) छोट्या पडद्यावरचा ‘चॉकलेट हिरो’ अशी ख्याती असलेला अभिनेता शशांक केतकर याची धाकटी बहीण आहे. बोलके डोळे आणि निरागस हास्य असलेली अभिनेत्री दीक्षा केतकर हिने या मालिकेत ‘ऐश्वर्या’ची भूमिका साकारली होती. किशोरवयीन ऐश्वर्याचं तीन मुलांचा बाप असलेल्या गृहस्थाशी कसं लग्न ठरतं, ऐश्वर्या जाधव घराण्याची सून म्हणून शोभून दिसते का, हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | ‘धमक्या देऊ नका, असे अनेक आले आणि गेले…’, तृप्ती देसाई आणि विकासमध्ये होणार शब्दांचे वार!

KBC 13 | ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये पुन्हा घडली चुक, ‘Darbar Move’ संबंधित प्रश्न चुकल्याचा प्रेक्षकाचा दावा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI