Bigg Boss Marathi 3 | ‘धमक्या देऊ नका, असे अनेक आले आणि गेले…’, तृप्ती देसाई आणि विकासमध्ये होणार शब्दांचे वार!

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोशात सुरुवात झाली आहे. यंदा घरात भरपूर हल्लाकल्लोळ पाहायला मिळतो आहे. अवघ्या आठवड्याभरात स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. यानंतर आता अखेर एलिमिनेशन प्रक्रिया सुरु झालेली आहे.

Bigg Boss Marathi 3 | ‘धमक्या देऊ नका, असे अनेक आले आणि गेले...’, तृप्ती देसाई आणि विकासमध्ये होणार शब्दांचे वार!
Bigg Boss Marathi 3

मुंबई : पहिल्याच आठवड्याच्या दिवशी महेश मांजेरकर (Mahesh Manjrekar) यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. ‘बा’च्या चावडीवर स्पर्धकांना शब्दांचा चांगलाच मार खावा लागला. मात्र, पहिल्याच आठवड्यातील एलिमिनेशन रद्द झाल्याने स्पर्धक देखील आनंदी झाले. पण, आता या आनंदावर लवकरच विरजण पडणार असं दिसतंय. याला कारणीभूत ठरणार आहे या आठवड्यातील नवा टास्क. ‘जोडी की बेडी’ असं या नव्या टास्कचं नाव आहे.

आता स्पर्धकांना चक्क या घरात एकटं फिरता देखील येणार नाहीये. येत्या आठवड्यातील हा कठीण टास्क संपूर्ण आठवडाभर चालणार आहे. यामुळेच आता स्पर्धकांना एकटं नाही तर, ‘बिग बॉस’ने निवडून दिलेल्या जोडीदारासोबतच घरात वावरावं लागणार आहे.

जोडी की बेडी?

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोशात सुरुवात झाली आहे. यंदा घरात भरपूर हल्लाकल्लोळ पाहायला मिळतो आहे. अवघ्या आठवड्याभरात स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. यानंतर आता अखेर एलिमिनेशन प्रक्रिया सुरु झालेली आहे. या आठवड्यापासून स्पर्धकांना घरा बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले जाणार आहे. दरम्यान जोडी की बेदी टास्कमध्ये ‘हल्ला बोल’ हा खेळ देण्यात आला आहे. यात निवडून दिलेल्या जोडीने गार्डन एरियातील बाईकवर बसून इतर सदस्यांकडून दिला जाणारा त्रास सहन करायचा आहे.

स्पर्धकांवर होणार हल्लाबोल

‘हल्ला बोल’ टास्कमध्ये दुसरी जोडी बाईकवर बसली ती म्हणजे विकास आणि विशाल. यावेळी त्यांच्यावर पाणी, साबण, तेल अशा सगळ्या गोष्टींचा मारा करण्यात आला. तर, यावेळी विकास तृप्ती देसाईंना म्हणाला की, आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त त्रास देऊ, असे म्हटले आहे. तर, यावर ‘जा धमक्या देऊ नका, असे अनेक आले आणि गेले…’, असे म्हणत त्याच्यावर शाब्दिक पलटवार केला.

पाहा व्हिडीओ :

‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’

बिग बॉस आणि वाद हे तसं नवं समीकरण नाही. यावेळी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि स्पर्धक तृप्ती देसाई, अभिनेत्री सोनाली पाटील हिला ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात म्हणताना दिसल्या. यानंतर सोनाली देखील त्यांच्याशी भांडताना दिसली. यावेळी तिने ‘महिला’ हा विषय उचलून धरला होता. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात अशा आशयाचे बोल बोलत ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला.

मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

हेही वाचा :

KBC 13 | ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये पुन्हा घडली चुक, ‘Darbar Move’ संबंधित प्रश्न चुकल्याचा प्रेक्षकाचा दावा…

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसने कॅरी केला मर्लिन मुन्रो लूक, ‘या’ ऑफ शोल्डर ड्रेस किंमत माहितेय का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI