Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसने कॅरी केला मर्लिन मुन्रो लूक, ‘या’ ऑफ शोल्डर ड्रेस किंमत माहितेय का?

जॅकलिनचे हे दोन्ही लूक लोकांना खूप आवडत आहेत. दुसरीकडे, जॅकलिनने पुन्हा एकदा तिच्या भारतीय वेस्टर्न लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. यावेळी जॅकलिनने पहिल्यांदा पांढऱ्या साडीत तिचा सुंदर लूक दाखवला आहे, तर नंतर तिने पांढरा ऑफ शोल्डर गाऊन कॅरी केला आहे.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसने कॅरी केला मर्लिन मुन्रो लूक, ‘या’ ऑफ शोल्डर ड्रेस किंमत माहितेय का?
Jacqueline Fernandez

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कधी भारतीय कपड्यांमध्ये तर, कधी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये ग्लॅमरस लूक धरण करत चाहत्यांसमोर येते. अलीकडेच जॅकलिनने काळ्या रंगाचा फुलांचा लेहंगा परिधान केला होता, जॅकलिनने ब्लॅक वेस्टर्न पोशाखात तिचा फोटो शेअर केला तेव्हा चाहते तिच्या लूकचे कौतुक करत होते. ज्यामध्ये तिने जाळीदार टॉप, शर्ट आणि टॉर्न स्वेटर असलेला ब्लॅक ब्लेझर घातला होता.

जॅकलिनचे हे दोन्ही लूक लोकांना खूप आवडत आहेत. दुसरीकडे, जॅकलिनने पुन्हा एकदा तिच्या भारतीय वेस्टर्न लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. यावेळी जॅकलिनने पहिल्यांदा पांढऱ्या साडीत तिचा सुंदर लूक दाखवला आहे, तर नंतर तिने पांढरा ऑफ शोल्डर गाऊन कॅरी केला आहे.

चाहत्यांना जॅकलिनचे दोन्ही लूक आवडत आहेत, पण ते स्वतःच गोंधळून गेले आहेत की, दोघांपैकी जॅकलिनचा कोणता लूक सर्वात आकर्षक आहे? तुम्ही सुद्धा जॅकलिनचे दोन्ही पांढरे पोशाख पहा आणि तुम्हीच ठरवा की जॅकलिनचा कोणता लूक तुम्हाला आवडला…

जॅकलिन फर्नांडिसने कॅरी केला मर्लिन मुन्रो लूक

तुम्ही मर्लिन मुन्रोला पाहिले आहे का? जर तुम्ही पाहिले नसेल, तर जॅकलिन फर्नांडिसकडे बघा. तिने एक पांढरा फ्लोटी गाऊन घातला आहे, ज्यात ती अगदी हुबेहुबे मर्लिन मुन्रोसारखी दिसते आहे. तिचा आकर्षक लूक पाहून चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे. तिचा पोशाख अगदी नववधूसारखा आहे. जॅकलिनने ऑफ-शोल्डर सिल्क-सॅटीन व्हाईट गाऊन निवडलाय, ज्यात जॅकलिन अतिशय सुंदर दिसत आहे.

जॅकलिनने हा फ्री फ्लोव्हिंग सिलीहूट गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचे पाय अधिक ठळक दिसत आहेत. या रेशीम सॅटीन गाऊनची किंमत 44,860 रुपये आहे. जॅकलिनचा हा पोशाख कोणत्याही वधूवर खूप सुंदर दिसेल.

पाहा जॅकलिनचा लूक

याआधी जॅकलिनने क्लासिक व्हाईट साडी कॅरी केली होती. जॅकलिनची ही साडी खूप सुंदर आहे. या साडीसह जॅकलिनने मॅचिंग एम्ब्रॉयडरीसह एक निळसर पांढरे जॅकेट घातले होते, ज्यामुळे तिच्या आउटफिटमध्ये आधुनिक टच आला होता. जॅकलिनच्या साडीवर पांढऱ्या धाग्यांनी भरतकाम करण्यात आले आहे.

पाहा जॅकलिनचा लूक

जॅकलिनचे ब्लाऊज या साडीला अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवत आहे. जॅकलिनने स्लीव्हलेस ब्रालेट स्टाईल ब्लाऊज घातला आहे.

जॅकलिनची कारकीर्द

जॅकलिनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिनं पहिला कार्यक्रम होस्ट केला होता तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या जॅकलिननं सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलं आणि श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

जॅकलिन फर्नांडिसची 2006 मध्ये ‘मिस श्रीलंका युनिव्हर्स’ म्हणून निवड झाली आणि त्यानंतर 2009 मध्ये ‘अलादीन’ चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. या चित्रपटानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज घडीला जॅकलिन एक अशी अभिनेत्री आहे, जी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींना आपल्या बोल्ड अभिनयाने मागे टाकते. जॅकलिन अनेकदा तिच्या बोल्ड स्टाईलची जादू सोशल मीडियावर दाखवते. तिची ही स्टाईल चाहत्यांच्याही पसंतीस उतरते.

हेही वाचा :

Tom Alter Death Anniversary | हिंदी चित्रपटांचा ‘इंग्रज’, राजेश खन्नांकडून प्रेरणा घेऊन मनोरंजन विश्वात आलेले टॉम अल्टर!

पुष्पा चित्रपटातील रश्मिका मंदनाचा पहिला लूक प्रदर्शित, अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहतेही झाले अवाक्!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI