Tom Alter Death Anniversary | हिंदी चित्रपटांचा ‘इंग्रज’, राजेश खन्नांकडून प्रेरणा घेऊन मनोरंजन विश्वात आलेले टॉम अल्टर!

आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी, या दिवशी म्हणजेच 29  सप्टेंबर 2017 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील इंग्रज म्हणून प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांनी जगाला निरोप दिला. टॉम अल्टर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी त्वचेच्या कर्करोगाने निधन झाले.

Tom Alter Death Anniversary | हिंदी चित्रपटांचा ‘इंग्रज’, राजेश खन्नांकडून प्रेरणा घेऊन मनोरंजन विश्वात आलेले टॉम अल्टर!
Tom Alter

मुंबई : जर तुम्ही ज्येष्ठ चित्रपट निर्माते सत्यजित रे (Satyajit Ray) यांचा ‘शतरंज के खिलाडी’ (Shatranj Ke Khiladi) हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला अभिनेता टॉम अल्टर (Tom Alter) कोणत्या प्रकारची व्यक्ती होती, याची कल्पना येईल. टॉम ऑल्टरने या चित्रपटात कॅप्टन वेस्टनची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटातील त्यांचा अभिनय इतका जबरदस्त होता की, पाहणारा प्रत्येकजण त्यांचे कौतुक करायला थकत नव्हता. अभिनेते टॉम अल्टर यांची आज चौथी पुण्यतिथी आहे.

आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी, या दिवशी म्हणजेच 29  सप्टेंबर 2017 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील इंग्रज म्हणून प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांनी जगाला निरोप दिला. टॉम अल्टर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी त्वचेच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांनी जगाला अशा प्रकारे निरोप दिल्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले. टॉम अल्टर यांना उर्दूचेही भरपूर ज्ञान होते. ते कोणतीही उर्दू कविता अगदी सहज बोलू शकत होते. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठरायचे.

राजेश खन्नांचा ‘आराधना’ पाहून मिळाली होती अभिनयाची प्रेरणा!

टॉम अल्टर हे केवळ अभिनेता नव्हते, तर ते क्रिकेट पत्रकार आणि एक हुशार खेळाडू देखील होते. तूर्तास, आपण आज टॉम अल्टर यांच्या खेळाबद्दलच्या उत्कटतेबद्दल बोलणार नाही. आज टॉम अल्टर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हा क्रिकेट पत्रकार चित्रपट जगतात कसा आला.

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्यामुळे टॉम अल्टरने अभिनय विश्वात पाऊल टाकले, हे कोणापासूनही लपलेले नाही. टॉम अल्टर, राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ हा चित्रपट पाहिल्यानंतर इतके प्रभावित झाले की, त्यांनीही अभिनयाच्या जगात स्वतःला झोकून देण्याचे काम हाती घेतले. टॉम अल्टरने राजेश खन्ना यांना पहिल्यांदा अशा पात्रामध्ये पाहिले होते, जे पाहून त्यांना वाटले की, आपण सुद्धा चित्रपटांमध्ये हात आजमावू शकतो.

त्यांच्या एका मुलाखतीत, टॉम अल्टर त्यांच्या हिंदी चित्रपट प्रवासाबद्दल बोलताना म्हणाले की, माझा चित्रपट प्रवास कुतुहलाने भरलेला होता, पण तो खूप थकवणाराही होता. मी माझ्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. मी क्रीडा शिक्षक, पत्रकार होतो आणि मग राजेश खन्नाला पाहून मी खूप प्रभावित झालो. माझे प्रेम आणि त्यांच्याबद्दलचे कौतुक मला चित्रपटांच्या जगात घेऊन आले. जेव्हा मी या उद्योगात प्रवेश केला तेव्हा माझ्या आयुष्यात बरेच काही बदल झाले होते.

हेही वाचा :

पुष्पा चित्रपटातील रश्मिका मंदनाचा पहिला लूक प्रदर्शित, अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहतेही झाले अवाक्!

Mouni Roy : मौनी रॉयने शेअर केले बर्थ डे सेलिब्रेशनचे खास फोटो, पाहा क्लासी अंदाज

‘काय काय करतात हे आपल्यासाठी आणि आपण…’, महापौरांच्या ‘त्या’ व्हिडीओवर केदार शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI