‘काय काय करतात हे आपल्यासाठी आणि आपण…’, महापौरांच्या ‘त्या’ व्हिडीओवर केदार शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो...’, असे लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘काय काय करतात हे आपल्यासाठी आणि आपण...’, महापौरांच्या ‘त्या’ व्हिडीओवर केदार शिंदेंची खोचक प्रतिक्रिया
Kedar Shinde

मुंबई : मुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर फोडलं जातं, आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे थेट शिवसेनेवर टीका होते. हे चित्र यंदाही पाहायला मिळतं आहे. मात्र, सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांची शाळा घेतली. आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. हे सगळं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झालं, आणि ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. मात्र, आता या क्लिपवर अनेकांच्या प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो…’, असे लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा केदार शिंदे यांची पोस्ट

काय आहे प्रकरण?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यातच मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी सोमवार (दि.27) रोजी महापौर किशोरी पेडणेकर पहाटेच घराबाहेर पडल्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. महापौर सरळ पोहचल्या चेंबरच्या रस्त्यांवर. तिथं मनपा अधिकारी आधीच हजर होते. महापौरांनी या रस्त्याची पाहणी केली, आणि एका ठिकाणी जास्त खड्डे दिसल्याने महापौर संतापल्या. त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि सध्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली.

अधिकाऱ्यांनी महापौरांना काय सांगितले?

मनपा अभियंत्यांनी महापौरांना खड्डे भरण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं. या कामासाठी प्रत्येक ठिकाणी एक प्रभाग अधिकारी आणि एक अभियंता नियुक्त करण्यात आला आहे. पाऊस सतत सुरु असल्याने, खड्डा पुन्हा तयार होत आहेत, मात्र लवकरच सगळे खड्डे भरली जातील असं आश्वासन मनपा अभियंत्यांनी महापौरांना दिलं.

निलेश राणे म्हणतात…

दरम्यान, महापौरांकडून अधिकाऱ्यांची शाळा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. हा व्हिडीओ भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केला आणि महापौर किती सहज अभिनय करतात असा टोला लगावला. ते म्हणाले की, आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडम ना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणे अशक्य आहे, दिग्गज कलाकारांना सुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही. एकूणच, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या पाहणी अभियानाला निलेश राणेंनी पाहणी अभिनय ठरवलं आणि त्यांना अभिनयाचा अवॉर्ड देण्याची मागणी केली.

हेही वाचा :

अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ला मिळणार संपूर्ण चित्रपटगृह? सलमान खानचा ‘अंतिम’ पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता!

Mehmood Birth Anniversary | ‘या’ अभिनेत्रीला स्टार बनवण्यासाठी मेहमूदला बहिणीकडून खावी लागली बोलणी, वाचा किस्सा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI