वर्षा उसगांवकर यांचा नणदांसोबतचा वाद थेट कोर्टात, सासऱ्यानेही दिले संपत्तीमधून थेट हाकलून, ‘हे’ गंभीर आरोप आणि…

वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये धमाका केलाय. आता वर्षा उसगांवकर या थेट बिग बॉस मराठी 5 मध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

वर्षा उसगांवकर यांचा नणदांसोबतचा वाद थेट कोर्टात, सासऱ्यानेही दिले संपत्तीमधून थेट हाकलून, 'हे' गंभीर आरोप आणि...
Varsha Usgaonkar
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 4:43 PM

प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या सध्या बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव हे वर्षा उसगांवकर यांचे आहे. मात्र, वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुरूवातीला वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार वाद होताना दिसला. घरातील अनेक सदस्यांसोबत आतापर्यंत वर्षा उसगांवकर यांचे वाद झाल्याचे बघायला मिळतंय. आता तर अभिनेत्री जान्हवी हिच्यासोबत तर मोठी भांडणे झाली.

वर्षा उसगांवकर यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत राहिलेले आहे. वर्षा उसगांवकर या गोव्याचे माजी डिप्टी स्पीकर ए.के.एस. उसगांवकर यांची मुलगी आहेत. फेमस म्यूझिक कम्पोजर रवी शंकर शर्मा यांचा मुलगा अजय शंकर शर्मा यांच्या पत्नी आहेत. मात्र, वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यात मोठे चढउतार नक्कीच बघितले आहेत.

वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याने सुनेवर आणि लेकावर अनेक गंभीर आरोप केले. हेच नाही तर आपली सर्व संपत्ती ही दोन मुलींच्या नावावर केली. यानंतर बरीच वर्ष वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या नणंदेमधील वाद सुरू होते. हेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहोचला होता. वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याचे निधन 2012 मध्ये झाले.

निधनाच्या अगोदर त्यांच्या सासऱ्याने मृत्यूपत्रात स्पष्ट म्हटले होते की, माझ्या मुलाने आणि सुनेने माझा सांभाळ केला नाहीये. यामुळेच मी माझ्या सर्व संपत्तीमधून त्यांना बेदखल करत आहे आणि माझी सर्व संपत्ती ही मी माझ्या इच्छिने माझ्या दोन्ही मुलींच्या नावावर करत आहे. यानंतर हा वाद थेट कोर्टात देखील जाऊन पोहोचला होता.

एका रिपोर्टनुसार आजही वर्षा उसगांवकर या त्यांच्या नणंदेच्या संपर्कात नसतात. त्या एकमेकांना बोलत देखील नाहीत. त्यांच्यातील हा वाद अजूनही मिटला नाहीये. वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मराठी चित्रपटांसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. वर्षा उसगांवकर या मोठ्या संपत्तीच्या मालक देखील आहेत. मुळात म्हणजे वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही मोठी.

शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.