Bigg Boss OTT : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह 25 लाख रुपये जिंकले

बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT)   ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने बाजी मारली आहे.

Bigg Boss OTT : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह 25 लाख रुपये जिंकले
divya agarwal

मुंबई : बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT)   ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने बाजी मारली आहे. दिव्या अग्रवालने करण, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांना मागे टाकत ट्रॉफी खिशात घातली आहे. या ग्रँड फिनालेला बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख यांंनी हजेरी लावली होती. बिग बॉस ओटीटीची विजेती ठरल्यामुळे दिव्याला बिग बॉस ट्रॉफी तसेच 25 लाख रुपये मिळाले आहेत. (bigg boss ott grand finale reality show queen diva agarwal won bigg boss ott trophy awarded with 25 lakh rupees)

मोठ्या प्रमाणात चाहते असल्यामुले दिव्याचा मार्ग सुकर

‘बिग बॉस ओटीटी’चे टॉप 5 स्पर्धक शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे होते. या पाच स्पर्धकांपैकी बिग बॉस ओटीटी ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. ती संपली असून ही ट्रॉफी दिव्या अग्रवालने जिंकली आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच हा शो बघितला तर शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्याकडे या ट्रॉफीचे मुख्य दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, दिव्या अग्रवालची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. याच कारणामुळे तिला ट्रॉफी जिंकणे सोपे गेले.

रितेश आणि जिनिलियाने केली चांगलीच धम्माल

बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री जिनिलीया तसेच रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनीही स्पर्धकांसोबत चांगलीच मस्ती केली. दोघांनीही केलेल्या मस्तीमुळे बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड फिनाले शोमधील वातवरण काही काळासाठी हलके फुलके झाले होते. तसेच ग्रँड फिनालेदरम्यान कॉमेडियन भारती सिंह तसेच हर्ष लिंबाचिया यांनीदेखील खरमरीत विनोदांची बरसात केली.

इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’ची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नव्या पर्वातील नवं घर

Annabelle Sethupathi Review | भूत, पुनर्जन्म आणि बदल्याची कथा, वाचा कसा आहे तापसी पन्नू-विजय सेतुपतीचा नवा चित्रपट…

Rajeshwari Kharat: लाल परी…. चाहत्यांना वेडापिसा करणारा राजेश्वरी खरातचा बोल्ड लूक पाहिलाय का?

(bigg boss ott grand finale reality show queen diva agarwal won bigg boss ott trophy awarded with 25 lakh rupees)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI