Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’ची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नव्या पर्वातील नवं घर

शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम आहे. (Preparations for ‘Bigg Boss Marathi 3’ are complete, see how the new home is)

1/7
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

2/7
‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. सोबतच आता नव्या पर्वाच्या नव्या घराचे फोटोसुद्धा समोर आले आहेत.

3/7
19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे.

4/7
शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम आहे.

5/7
महेश मांजरेकर प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र प्रोमोमध्ये मांजरेकरांचं दर्शन घडल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

6/7
या सुंदर घराची झलक आता प्रेक्षकांच्यासुद्धा पसंतीस येत आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

7/7
घराच्या हॉल पासून ते बेड रुम पर्यंत हे घर फारच क्लासी आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI