AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

You Know? : सिद्धार्थ मल्होत्रानं म्हणतो, अभिनेता नसतो तर सैनिक झालो असतो!

आज सिद्धार्थ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सिद्धार्थला भारतीय लष्करात भरती व्हायचं होतं. (Bollywood actor Siddharth Malhotra reveals, if not an actor, then this was the plan)

You Know? : सिद्धार्थ मल्होत्रानं म्हणतो, अभिनेता नसतो तर सैनिक झालो असतो!
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 8:02 AM
Share

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा ​(Siddharth Malhotra) ​आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर चित्रपट शेरशाह सुपरहिट ठरला आहे. ‘शेरशाह’ (Sher Shah) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. यासह, सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री आणि कामगिरीची देखील खूप प्रशंसा केली जात आहे.

या चित्रपटात सिद्धार्थनं भारतीय लष्कराचे कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका अतिशय उत्तम आणि मोठ्या उत्साहानं साकारली होती. ज्याचे त्याच्या चाहत्यांनीच नाही तर समीक्षकांनीही खूप कौतुक केलं.

सिद्धार्थला अभिनेता नाही तर व्हायचं होतं सैनिक

आज सिद्धार्थ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सिद्धार्थला भारतीय लष्करात भरती व्हायचं होतं, त्यानं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं.

सिद्धार्थचे आजोबा देखील एक सैनिक होते. ते 1946 मध्ये भारत चीन युद्धात सहभागी होते. आजोबांना बघूनच सिद्धार्थचीही सैन्यात जाण्याची उत्कट इच्छा होती, मात्र नशीबानं आज त्याला अभिनेता बनवलं.

पाहा व्हिडीओ

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आल्या अनेक अडचणी 

आज चित्रपटाचं सर्व बाजूंनी कौतुक होत आहे, मात्र सिद्धार्थनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही ठिकाणे होती जिथं खूप शारीरिक समस्या आल्या. बऱ्यापैकी थंडी होती पण विक्रमच्या पात्रात येताच त्यानं प्रत्येक कष्टाला तोंड देत कठोर परिश्रम केले. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या ‘शेर शाह’ या चित्रपटाची रिलीज झाल्यापासून चर्चा झाली आहे.

सर्वात मोठे आव्हान होतं विक्रम बत्रा यांची भूमिका

सिद्धार्थनं मोठ्या पडद्यावर अनेक पात्रं साकारली असली तरी तो देशाचा खरा नायक असलेल्या विक्रम बत्राच्या पात्राला आतापर्यंतचं सर्वात कठीण आणि आव्हानात्मक पात्र मानतो. ज्यामध्ये त्याला भावनिकदृष्ट्या खूप मजबूत व्हायचं होतं. कारण विक्रम बत्रा ती व्यक्ती होती ज्यांनी सहजपणे मातृभूमीसाठी आपले प्राण दिले. सिद्धार्थला पडद्यावर अशा शक्तिशाली भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक होतं.

सिद्धार्थने मानले चाहत्यांचे आभार 

शेरशाहला टॉप रेट दिल्याबद्दल सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे आभार मानत, सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यानं लिहिलं होतं की मला आज जगाच्या शीर्षस्थानी असल्यासारखं वाटतं. चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रत्येकाचे खरोखर आभार.

संबंधित बातम्या

Nusrat Jahan Baby: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं मुलाचं नाव ठेवलं ‘ईशान’, आज डिस्चार्जची शक्यता

Bigg Boss 15 New Promo : बिग बॉसचं घर झालं गायब, स्पर्धकांना आधी जंगल पार करावे लागणार?, पाहा व्हिडिओ

Birthday Special : आधी वडिलांच्या मित्राच्या मुलीशी लग्न; नंतर नागार्जुनच्या आयुष्यात अमलाची एन्ट्री, वाचा काही खास गोष्टी

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.