Mirzapur 3 Review : मिर्झापूरमधल्या 3 मधल्या 5 कमतरता, म्हणून मागच्या दोन सीजनपेक्षा तिसरा सीजन जास्त बोरिंग
Mirzapur 3 Review : OTT प्लॅटफॉर्मवरच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या मिर्झापूर वेब सीरीजचा तिसरा सीजन आला आहे. 4 वर्षानंतर 10 एपिसोड्सची ही वेब सीरीज प्रदर्शित झालीय. कालीन भैया. गुड्डू भैया, मुन्ना भैया या वेब सीरीजची जान आहेत. तिसरा सीजन कसा झालाय ते समजून घेऊया.

गाजलेल्या मिर्झापूर वेब सीरीजचा तिसरा सीजन आला आहे. प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून या वेब सीरीजची प्रतिक्षा होती. मिर्झापूरच्या काही चाहत्यांनी रिलीज झाल्या-झाल्या ही वेब सीरीज पाहून टाकली. यावेळी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीजनमध्ये 10 एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड जवळपास 1 तासांचा आहे. सीरीजचे पहिले दोन पार्ट खूप हिट ठरले. तिसऱ्या स्टोरीमध्ये कथेचा विस्तार आहे. पहिल्या दोन सीजनमध्ये जो वॉव फॅक्टर पहायला मिळालेला, तो तिसऱ्या सीजनमध्ये गायब आहे. याची 5 कारण आहेत. ती काय? ते जाणून घ्या.
मिर्झापूर 3 वेब सीरीजमधील पाच कमतरता काय?
मुन्ना भैया या सीरीजमधील प्रमुख पात्र आहे. तिसऱ्या सीजनची सुरुवातच मुना भैयाच्या अंत्यसंस्काराने होते. दिव्येंदु शर्माने ज्या पद्धतीने हो रोल प्ले केला ते प्रेक्षकांना आवडलेलं. तिसऱ्या सीजनमध्ये मुना भैया नाहीय. ही उणीव जाणवते. कारण या कॅरेक्टरची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याचं सीरीजमध्ये असणं महत्त्वाच आहे.
दुसरी कमतरता
कालीन भैया मिर्झापूर वेब सीरीजचा प्राण आहे. पण तिसऱ्या सीजनमध्ये त्यांचा रोल खूप शॉर्ट आहे. प्रेक्षक मिर्झापूर वेब सीरीज फक्त हिंसाचारासाठी पाहत नाही. त्यांच्याशिवाय 10 एपिसोड्स खेचून नेण रिस्क होती. समजत नाही, मेकर्सनी अशी रिस्क का घेतली?
तिसरी कमतरता
मागच्या सीजनमध्ये लाला आणि रॉबिनच कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडलेलं. तिसऱ्या सीजनमध्ये या दोन रोल्सवर तितका फोकस केलेला नाही. अपीलिंग वाटेल असे नवीन कॅरेक्टर नाहीयत.
चौथी कमतरता
या सीरीजमध्ये खूप शिवीगाळ असल्याचा आरोप होतो. मागच्या दोन सीजनमध्ये डायलॉग्सचा महत्त्वाचा रोल होता. तिसऱ्या सीजनमध्ये हे डायलॉग्स गायब दिसले.
पाचवी कमतरता
हा शेवटचा पण महत्त्वाचा पॉइंट. सीरीज यावेळी तशी जास्त ग्रीप घेते असं वाटत नाही. त्यात एपिसोड्स लांब लांब पर्यंत खेचण्यात आलेत. सीरीज 8 ऐवजी 10 एपिसोड्सची बनवलीय. त्यामुळे कंटाळा येऊ शकतो.
