Money Heist Season 5 Part 2 : चोरीच्या दरम्यान पुन्हा गायब झाला प्रोफेसर, ‘मनी हाईस्ट 5’च्या पुढच्या भागात कथेत येणार नवा ट्वीस्ट!

‘मनी हाईस्ट सीझन 5’चा भाग 2 (Money Heist Season 5 Part 2) डिसेंबर 3ला रिलीज होणार आहे, ज्याची प्रतीक्षा आता चाहत्यांना खूप कठीण वाटत आहे. जिथे आता नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

Money Heist Season 5 Part 2 : चोरीच्या दरम्यान पुन्हा गायब झाला प्रोफेसर, ‘मनी हाईस्ट 5’च्या पुढच्या भागात कथेत येणार नवा ट्वीस्ट!
Money Heist 5


मुंबई : ‘मनी हाईस्ट सीझन 5’चा भाग 2 (Money Heist Season 5 Part 2) डिसेंबर 3ला रिलीज होणार आहे, ज्याची प्रतीक्षा आता चाहत्यांना खूप कठीण वाटत आहे. जिथे आता नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

‘मनी हाईस्ट सीझन 5’ (Money Heist 5) अर्धा सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे, त्यानंतर आता प्रेक्षक त्याच्या उर्वरित भागांची वाट पाहत आहेत. या सीरीजमध्ये, यावेळी सर्व सदस्य त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि सोनं बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. बँक ऑफ स्पेनच्या आत एका प्रचंड स्फोटानंतर सर्व सैन्य अधिकारी मारले गेले आहेत आणि प्रोफेसरच्या टीमने त्यांची खास मैत्रीण टोकियो हिला देखील गमावले आहे. नेटफ्लिक्सने शनिवारी या मालिकेशी संबंधित एक विशेष क्लिप प्रदर्शित केली आहे. ज्यामुळे या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके आणखी वाढले आहेत.

नव्या व्हिडीओमुळे ताणली उत्सुकता

नेटफ्लिक्सने या मालिकेशी संबंधित 2 मिनिटांचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चोरी दरम्यान प्रोफेसर गायब होतात आणि ही चोरी पुन्हा थांबते. टीमचे सर्व सदस्य यावेळी हॉलमध्ये उभे राहून विचार करत आहेत की, आपण आता कसे पळून जाऊ आणि या बँकेतून सोने कसे बाहेर काढू. सध्या 90 टन सोने प्रोफेसरच्या टीमकडे पडून आहे, जे त्यांना बाहेर काढावे लागणार आहे. दरम्यान, संघातील पलेर्मो चिडला आणि त्याने रिओवर बंदूक ताणली. डेन्व्हर म्हणतो की, आम्ही ही परिचारिका जनरल तामायोला देतो आणि त्याला आम्हाला जाऊ देण्यास सांगतो. जिथे प्रत्येकाला शंका वाटत आहे की, पोलिसांची टीम अजूनही मिंटमध्ये आहे आणि त्यांचे बोलणे ऐकत आहे. जिथे हे सर्व ऐकल्यानंतर मनिला म्हणते की “ही जगातील सर्वात मूर्खपणाची चोरी योजना आहे.”

पाहा व्हिडीओ

या संपूर्ण व्हिडीओमध्ये सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे लिस्बन यावेळी शांत आहे आणि या सर्व गोष्टी काळजीपूर्वक ऐकत आहे. जिथे तिला सतत प्रोफेसरची चिंता असते. जिथे या सीनमध्ये मारामारी दिसते. परंतु, चाहत्यांचा असा विश्वास आहे की, लिस्बनची या ठिकाणामधून बाहेर पडण्याची खरी योजना आहे, फक्त प्रोफेसरांनी लिस्बनच्या विचारांना थोडे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. येणाऱ्या एपिसोड्समध्ये पुढे काय घडणार हे कळणार आहे.

सर्वाधिक पहिला गेलेला शो

‘मनी हाईस्ट सीझन 5’चा उर्वरित दुसरा भाग 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, आता चाहत्यांना प्रतीक्षा करणे कठीण झाले आहे. ‘मनी हास्ट सीझन 5’ हा देखील जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे. यामुळे आता प्रेक्षकांना तो पूर्ण पाहायचा आहे.

हेही वाचा :

Birthday Special : 53 वर्षांचा झाला राहुल देव, 18 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट

Movies Release Date : चित्रपटगृहांमध्ये धमाल करण्यासाठी बॉलिवूड अभिनेते तयार, पाहा 2021 ते 2023पर्यंत रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI