Pataudi Palace | पतौडी पॅलेसमध्ये तांडवचं शूटिंग, परंतु या कारणामुळे सैफ अस्वस्थ!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) 'तांडव' (Tandav) वेब सीरीजचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. वेब सीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:46 AM, 10 Jan 2021
Pataudi Palace | पतौडी पॅलेसमध्ये तांडवचं शूटिंग, परंतु या कारणामुळे सैफ अस्वस्थ!

 मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) ‘तांडव’ (Tandav) वेब सीरीजचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला. या वेब सीरीजमध्ये सैफ अली खानची पूर्णपणे स्टाईल बदली आहे. विशेष म्हणजे ‘तांडव’ वेब सीरीजचे काही सीन सैफ अली खानच्या पतौडी पॅलेस पॅलेसमध्ये शूट करण्यात आले. सैफने निर्मात्यांना त्याच्या या पॅलेजमध्ये शूटिंग करण्याची परवानगी दिली. अलीकडे याबाबतचा खुलासा सैफने केला आहे. (Shooting of the Tandava web series at Saif Ali Khan’s Pataudi Palace)

मिड-डेच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानने सांगितले आहे की शूटिंगसाठी माझे पॅलेस देण्यासाठी काहीच हरकत नाही. मी शूटिंगसाठी माझे पॅलेस देऊ शकतो, कारण वर्षाच्या 340 दिवस ते बंदच असते. तांडव वेब सीरीजच्या टिमला पॅलेसमध्ये शूटिंग करू देण्याचे मुख्य कारण म्हणजे मला माहिती होते की, ते पॅलेसचे काही नुकसान करणार नाहीत. पण बऱ्याच दा माझे विचार पॅलेस भोवती फिरतात आणि मी काही वेळासाठी अस्वस्थ देखील होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये सरताजची भूमिका साकारत सैफने आपल्या चाहत्यांना धक्का दिला. सैफची ही पहिली वेब सीरिज होती. ‘तांडव’ वेब सीरीजचे सैफच्या चाहत्यांमध्ये आणखीन उत्साह वाढला आहे.

सैफ अली खान लवकरच वेब सीरीज ‘तांडव’  मध्ये दिसणार आहे. नुकताच एक पोस्टर तांडव वेब सीरीजचे प्रसिध्द झाले होते. त्यामध्ये सैफ एखाद्या राजकीय नेत्यासारखा लोकांना अभिवादन करताना दिसत होता. तर त्याच्यासोबत या पोस्टरमध्ये डिंपल कपाडिया देखील दिसत होती. ती देखील एखाद्या राजकिय महिलेच्या भूमिकेत दिसत होती. या वेब सीरीजचा पहिला टीझर 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता.प्राइम व्हिडिओने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आणि लिहिले की, “तयार व्हा, आपण तांडव युगामध्ये प्रवेश करणार आहोत

संबंधित बातम्या : 

OTT Debut | संजय लीला भन्साळी ‘इतिहासातून भविष्याकडे’, उचलणार मोठं पाऊल, रिचा चड्ढाला लॉटरी?

मिर्झापूर 2 मुळे अली फजलचा ‘भाव वाढला’, आता नव्या प्रोजेक्टसाठी घेतोय मोठं मानधन!

(Shooting of the Tandava web series at Saif Ali Khan’s Pataudi Palace)