Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना ‘पुष्पा’ने लावले वेड; म्हणतात…!

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांनी आपल्या विरोधकांना योग्य तो संदेश दिलाच, सोबत आपण कसे आहोत, हे फक्त एका वाक्यात सांगून टाकले. तुम्हीही हा व्हिडिओ, डागलॉग आणि त्यांचा हटके अंदाज काय आहे ते जाणून घ्या.

Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना 'पुष्पा'ने लावले वेड; म्हणतात...!
आमदार संदीप क्षीरसागर पुष्पाच्या हटके अंदाजात.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:17 PM

बीडः अल्लू अर्जूनच्या पुष्पा सिनेमाने भल्या-भल्यांना वेड लावले. त्याच्याच पंगतीत आता मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार (MLA) संदीप क्षीरसागरही (Sandeep Kshirsagar) सहभागी झालेत. त्यांनी नुकताच पुष्पा सिनेमा पाहिला. त्यातले अल्लू अर्जूनचे डायलॉग आणि सिनेमाही त्यांना तुफान आवडला. मग काय, एका राजकीय सभेत त्यांचा आगळावेगळा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. त्यांनीही थेट पुष्पासारखी डायलॉगबाजी करून चाहत्यांना खूष केलेच. सोबतच व्यासपीठावरील मान्यवरांनीही टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत केले. यावेळी क्षीरसागरांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांनी आपल्या विरोधकांना योग्य तो संदेश दिलाच, सोबत आपण कसे आहोत, हे फक्त एका वाक्यात सांगून टाकले. तुम्हीही हा व्हिडिओ, डागलॉग आणि त्यांचा हटके अंदाज काय आहे ते जाणून घ्या.

काय म्हणाले क्षीरसागर?

आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात एक सभा होती. तिथे त्यांनी भाषण केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्या भाषणात आमदार क्षीरसागर म्हणतात, माझा एक डायलॉग ऐका सर. मी नुकताच एक पिच्चर बघितलाय. मी प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगतोय, सर्व एक होऊन लढणार आहेत. हे चित्र तुम्हाला अजून सुद्धा दिसेल. जेव्हा लोक सोबत येत नाहीत, तेव्हा ही परिस्थिती होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सर्व एकत्र येऊन लढणार. पण मला भीती नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामागचे गुपित त्यांनी काय सांगितले, ते ही जाणून घ्या.

लई दिवसांनी पिच्चर…

आमदार संदीप क्षीरसागर भाषणात आपल्या विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, तु्म्ही सर्व एकत्र येऊन लढा. मला भीती नाही. कारण माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. युवकांची ताकद माझ्यासोबत आहे. ज्येष्ठांची ताकद माझ्यासोबतय. मी पुष्पा पिच्चर पाहिला. लई दिवस पिच्चर पाहिला नव्हता. मला वेळच नव्हता. त्यादिवशी औरंगाबादला गेलो होतो कामानिमित्त. त्यादिवशी थोडासा वेळ होता. म्हणल पिच्चरला जावं. त्या पिच्चरमध्ये डायलॉग होता. झुकेगा नही…एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या आणि वन्समोरची मागणी केली.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.