
Kapil Sharma Cafe Firing: काही दिवसांपूर्वी विनोदवीर कपिल शर्मा याने कॅनडा याठिकाणी कॅफे सुरु केला. ज्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ल्याची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनलने घेतली आहे. या खलिस्तानी संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डीने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तो एक कुख्यात दहशतवादी आहे. हरजीत सिंग याने आतापर्यंत अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत.
कपिल शर्मा याने नुकताच कॅनडा याठिकाणी कॅफे Kap’s सुरु केला. मोठ्या थाटात कपिलने पत्नी गिन्नी हिच्यासोबत कॅफेचं उद्धाटन देखील केलं. त्याने नव्या कॅफेचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कपिलच्या याच नव्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात एकूण 10 ते 12 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.
बब्बर खालसा दहशतवादी हरजीत सिंग लाड्डीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लाड्डी हा NIA च्या यादीतील मोस्टवँटेड दहशतवादी आहे. हरजीत हा मूळचा पंजाबमधील नवांशहरमधील गरपधाना गावचा रहिवासी आहे. याआधी देखील त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडवले आहेत. एप्रिल 2024 मध्ये, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पंजाबमध्ये विहिंप नेते विकास प्रभाकर यांच्या हत्येप्रकरणी लाड्डीवर 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं.
#BREAKING: Khalistani terrorists attack Comedian Kapil Sharma’s Kap’s Cafe in Surrey, Canada. Designated Khalistani terror group Babbar Khalsa International’s Harjit Singh Laddi claims responsibility. More details are awaited. Video: @RiteshLakhiCA
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 10, 2025
हरजीत सिंग लाड्डीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशीही संबंध आहेत. तो पाकिस्तानस्थित बब्बर खालसा ग्रुपचा प्रमुख बब्बरसोबत काम करतो आणि जागतिक कारवाया आणि निधीची जबाबदारी त्याच्यावर आहे. हरजीत हा जर्मनी याठिकाणी राहतो आणि कॅनडा येथील सर्व घटना तोच घडवून आणतो… अशी माहिती देखील समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, बब्बर खालसा इंटरनॅशलन ही एक मोठी दहशतवादी संघटना आहे, ज्याची स्थापना 1978 मध्ये झाली होती, तिचे उद्दिष्ट खलिस्तानची स्थापना करणे होते. 1980 आणि 1990 च्या दशकात झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग होता. भारताव्यतिरिक्त, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपियन युनियनने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. संघटनेचा प्रमुख बब्बर खालसा पाकिस्तानात राहतो आणि तेथूनच तो दहशतवादी कारवाया करतो. त्याच्यावर देखील अनेक गंभीर आरोप आहेत.