
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या अभिनयापैक्षाही तिच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चेत असते. पलकचाही एक मोठा चाहता वर्ग आहे. जे तिच्या प्रत्येक गोष्टीला फॉलो करताना दिसतात. पलक आता एका हटक्या भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. ती आता लवकरच ‘भूतनी’ या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. पलक तिवारी संजय दत्तसोबत या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा भाग असणार आहे. पण आता पुन्हा एकदा पलक एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसत आहे.
पलक तिवारी पापाराझींवर का चिडली?
पलक विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा पापाराझीने तिला फोटो काढण्यासाठी थांबवलं पण ती न थांबता पुढे निघून गेली. घाईत दिसणाऱ्या अभिनेत्रीला पापाराझींनी अनन्या पांडेच्या नावाने आवाज दिला. आणि हे ऐकून ती फार चिडली. हा व्हिडिओ एका पापाराझीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नक्की काय आहे किस्सा जाणून घेऊयात.
‘तुम्ही लोक नेहमी असे का बोलता?’
पलक तिवारी जेव्हा विमानतळावर स्पॉट झाली पण ती तेव्हा फार घाईत दिसत होती. व्हिडिओमध्ये, पापाराझीने तिला विचारलं की, ‘ तुम्हाला पलक तिवारी बोलू की अनन्या पांडे?’ सुरुवातीला पलकने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा पापाराझीने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा ती चिडली आणि म्हणाली, ‘तुम्ही लोक नेहमी असे का बोलता?’ तुम्हाला कसला राग आलाय का?
पलक तिवारीच्या ‘भूतनी’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर….
पलक तिवारीच्या ‘भूतनी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर, हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे ज्याचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, मौनी रॉय, सनी सिंग आणि पलक तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी पलक तिवारी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती.