
Palash Muchhal-Palak Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल अडचणीत आला आहे. क्रिकेटर स्मृती मानधना हिच्या वडिलांनी पलाश याच्याशी ओळख करुन दिल्याचा दावा सांगलीतील विज्ञान माने यांनी केला आहे. माने यांनी पलाश याने 40 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता पलाशने कायदेशीर उत्तर देण्याचे ठरवलं आहे. त्याने हे आरोप फेटाळले आहेत. या वादा दरम्यान पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचं आणि तिचं लोक कौतुक करत आहेत.
पलक मुच्छल हिने काय केली पोस्ट?
पलक मुछाल हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शुक्रवारी एक पोस्ट शेअर केली. त्यात ती वसंत पंचमीचं एक गाणं सादर करताना दिसत आहे. तर सरस्वती देवीची प्रार्थना करण्यासाठीचा एक मंत्र पण तिने लिहिला आहे. पलक हिच्या गोड गळ्याने या गीताला बहर आला आहे. या व्हिडिओवर तिने कॅप्शन पण लिहिली आहे. वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन तिनं लिहलं आहे. सोशल मीडियावर हे गाण आणि पलकचं नेटकरी चांगलंच कौतुक करत आहे. तिने सुंदर गाणं गायल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.
पलाश मुच्छल याने काय केला खुलासा?
सांगलीतील विज्ञान माने यांच्या 40 लाखांच्या फसवणुकीच्या आरोपावर संगीतकार पलाश मुच्छल याने मोठा खुलासा केला आहे. त्याने सोशल मीडियावर याविषयी भलीमोठी पोस्ट लिहित खुलासा केला. “सांगलीतील विज्ञान माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर जे आरोप केले आहेत. त्यावर मी हे स्पष्ट करतो की, माझ्यावरील हे सर्व आरोप साफ खोटे आणि तथ्यहीन आहेत. हे आरोप माझी छबी खराब करण्यासाठी करण्यात आले आहेत. त्यांच्याकडं मी दुर्लक्ष करू इच्छित नाही. माझे वकील श्रेयांश मिथारे हे सर्व कायदेशीर मार्ग शोधत आहेत. कायदेशीर मार्गानेच त्याला उत्तर देण्यात येईल.” असे पलाशने स्पष्ट केले आहे.
फसवणुकीसह तो गंभीर आरोप
सांगली येथील 34 वर्षीय विज्ञान माने याने स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पलाश याने त्याच्याकडून मोठा परतावा आणि चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचे आमिष दाखवून 40 लाख रुपये घेतले आणि ते परत करण्यास तो नकार देत आहे. माने यांच्या दाव्यानुसार तो क्रिकेटर स्मृती मानधनाचा बालमित्र आहे. तर स्मृती आणि पलाशच्या लग्नाची तयारी सुरू असताना 23 नोव्हेंबर 2025 रोजी पलाश हा दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडल्या गेला आणि त्याला सर्व महिला क्रिकेटपटूंनी धो धो धुतल्याचा खळबळजनक दावा ही माने यांनी केला आहे.