‘पंचायत 4’मधील किसिंग सीन का हटवला? ‘रिंकी’नेच सांगितलं कारण

‘पंचायत 4’मधील त्या सीनवर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, असाही प्रश्न सांविकाला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “अद्याप तरी कुटुंबीयांसोबत याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. परंतु ते मला समजतात. पंचायतसारख्या सीरिजमध्ये मी काम करतेय, याचा त्यांना खूप आनंद आहे.”

‘पंचायत 4’मधील किसिंग सीन का हटवला? ‘रिंकी’नेच सांगितलं कारण
पंचायत 4
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2025 | 1:37 PM

‘पंचायत’ ही ओटीटीवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. या सीरिजचे आतापर्यंत चार सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामधील प्रत्येक भूमिकेनं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पंचायत’मध्ये प्रधानजींची मुलगी रिंकीची भूमिका साकारून अभिनेत्री सांविका घराघरात पोहोचली. परंतु इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, ती कुटुंबीयांना न सांगता मुंबईत करिअर करण्यासाठी आली होती. या मुलाखतीत ती ‘पंचायत 4’मधून काढून टाकण्यात आलेल्या किसिंग सीनबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली.

सीरिजमध्ये किसिंग देण्यासाठी सांविका कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळे निर्मात्यांनी तो सीन हटवून त्याजागी नवीन सीन समाविष्ट केला. याबद्दल अद्याप कुटुंबीयांना काहीच माहीत नसल्याचं तिने सांगितलं आहे. ती म्हणाली, “जेव्हा कथा सांगितली गेली, तेव्हा कोणीच काही म्हणालं नव्हतं. परंतु नंतर या सिझनचे दिग्दर्शक अक्षय यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की या सिझनमध्ये आम्ही एक असा सीन समाविष्ट केला आहे, जिथे सचिवजी आणि रिंकी एकमेकांना किस करतील. आधीचा सीन थोडा वेगळा होता. त्यात जेव्हा दोघं गाडीमध्ये असतात, तेव्हा रिंकी पडते आणि दोघं एकमेकांना किस करतात.”

“सीन समजून घेतल्यानंतर मी त्यांच्याकडे दोन दिवसांचा वेळ मागितला होता. तसा सीन करण्यासाठी मी कम्फर्टेबल आहे की नाही, याबद्दल विचार करण्यासाठी मला वेळ हवा होता. मग मी विचार केला की, ‘पंचायत’चा प्रेक्षकवर्ग प्रत्येक वयोगटातील आहे, पण त्यात कौटुंबिक अधिक आहेत. किसिंग सीनवर त्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी असेल, असा विचार मनात आला. मीसुद्धा तसा सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळे मी त्यांना नकार दिला होता. नंतर शूटिंग करताना त्यांनी तो सीन हटवला होता. पण त्यांनी तो टाकीवाला सीन त्यात समाविष्ट केला होता. त्यातही त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही त्याला घाणेरड्या पद्धतीने शूट करणार नाही. तरीही जेव्हा आपण शूट करतो, तेव्हा अजब तर वाटतंच. मी खूप असहज झाले होते. परंतु जीतू खूप चांगला आहे. त्यांनी माझी खूप मदत केली”, असं तिने पुढे सांगितलं.