
Paresh Rawal: ‘हेरा फेरी’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कारण अभिनेते परेश रावल यांनी सिनेमासाठी प्रोमो शूट केल्यानंतर सिनेमात काम करण्यास नकार दिला. सिनेमात परेश रावल यांच्यासोवत अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अधीच्या दोन भागांमध्ये सिनेमाने चाहत्यांना पोट धरुन हसवलं. पण तिसऱ्या भागात काम करण्यास नकार दिल्यानंतर परेश रावल यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
पण परेश रावल अखेर सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले आहेत. परेश रावल यांनी सिनेमात काम करण्यास होकार दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता केआरके याने परेश रावल यांच्यावर निशाणा साधत त्यांची तुलना राखी सावंत हिच्यासोबत केली.
Paresh rawal said in his podcast that all the problems are solved and now he is back in #HeraPheri3. #DrKRK said at the time of controversy only that it’s just a publicity stunt. Paresh can’t leave this film. And Akshay can’t take legal action against Rawal. Nobody knows…
— KRK (@kamaalrkhan) June 29, 2025
केआरके याने एक्स पोस्ट करत परेश रावल यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या केआरके याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘हेरा फेरी 3’ सिनेमात परेश रावल यांनी पुन्हा काम करण्यास होकार दिल्यानंतर केआरके म्हणाला, ‘परेश रावल यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं सर्व समस्या मिटल्या आहेत आणि सिनेता काम करण्यास त्यांनी होकार दिला.’
‘वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मी सांगितलं होतं की, परेश रावल सिनेमा देखील सोडू शकत नाही आणि अक्षय कुमार याच्याविरोधात कारवाई करु शकत नाही. माझ्याशिवाय चांगलं बॉलिवूडला कोणी ओळखत नाही. त्यामुळे मी काही सांगितल्यानंतर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे…’
पुढे केआरके म्हणाला, ‘जो माणूस लघवी पिऊन आयुष्य जगत आहे तो माणूस प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतो… परेश रावल बॉलिवूडमधील सर्वात मोठा ड्रामा आहेत. त्यांना आपण मेल राखी सावंत देखील म्हणू शकतो…’ सध्या केआरकेचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे.