Parineeti Chopra : लग्नाच्या चर्चा सुरु असताना ‘या’ खास व्यक्तीसोबत लंडन फिरतेय अभिनेत्री
खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत नात्याच्या चर्चा रंगत असताना कोणासोबत लंडन फिरतेय अभिनेत्री परिणिती चोप्रा... 'हा' खास फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या रंगणाऱ्या चर्चांमुळे प्रसिद्धीझोतात आहे. परिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता असलेल्या नात्याला परिणीती आणि राघव कधी दुजोरा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांनी अद्याप नात्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. राघव चड्ढा यांच्यासोबत नात्याच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्री लंडन याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा हिची चर्चा सुरु आहे.
लग्नाच्या चर्चा रंगत असताना परिणीती मात्र परदेशात आयुष्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. परिणीती लंडनमध्ये एकटी नसून तिच्यासोबत खास व्यक्ती देखील आहे. तर परिणीती हिच्यासोबत लंडनमध्ये कोण फिरत आहे? याबद्दल जाणून घेवू…

परिणीती हिने हॉटेल रुममधील काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीचा बेडरुम देखील दिसत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, ‘सेम मिमी दीदी सेम..’ तिने पुढे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला देखील मेंशन केलं आहे. सध्या परिणीती हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दोघी बहिणी सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी प्रियांका पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत भारतात आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

याचदरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील कुटुंबासोबत मुंबईत आली आहे. त्यामुळे परिणीती आणि राघव दोघे लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १० एप्रिल रोजी साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
दिल्ली विमानतळावर जेव्हा अभिनेत्रीला लग्नाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा परिणीती लाजली आणि पुढे गेली. रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १० एप्रिल रोजी साखरपुडा उरकणार आहेत, दोघांच्या साखरपुड्यात फक्त कुटुंब आणि मित्र-परिवार उपस्थित राहणार आहेत. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
