जेठालालने ऑलिम्पिक विजेता अमन सेहरावतला भेट म्हणून दिले चक्क जलेबी फाफडा, दिलीप जोशी…
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रत्येक कलाकाराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक पात्र चर्चेत असते. मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी मालिकेला कायमची सोडचिठ्ठी दिलीये. मालिकेच्या पहिल्या भागापासून जेठालालचे पात्र दिलीप जोशी हे साकारत आहेत. विशेष म्हणजे त्यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर जलेबी फाफडा म्हटले की देखील सर्वांनाच जेठालालची आठवण येते.
दिलीप जोशी यांनी नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. दिलीप जोशी हे पॅरिस ऑलिम्पिक विजेता अमन सेहरावत याला भेटण्यासाठी गेले. काही दिवसांपूर्वीच अमन सेहरावत याने म्हटले होते की, मी वेळ काढून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका कायमच बघतो. मग काय अमनच्या या विधानानंतर थेट दिलीप जोशीच त्याला भेटण्यासाठी पोहोचले.
विशेष म्हणजे दिलीप जोशी हे अमन सेहरावत याला भेटण्यासाठी जाताना चक्क जलेबी फाफडा घेऊन गेले. यानंतर दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर भेटीचे काही फोटो शेअर करत खास पोस्टही शेअर केली. फक्त दिलीप जोशी यांनीच नाही तर अमन सेहरावत यानेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही व्हायरल होताना दिसतंय.

दिलीप जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ब्रॉन्ज मेडल जिंकण्याचे काैतुक यापेक्षा वेगळे खास नसू शकते. यासोबतच एका फोटोमध्ये दिलीप जोशी हे अमन सेहरावत याला जलेबी फाफडा भेट देताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेजण मस्त गप्पा मारत बसल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे. आता दिलीप जोशी यांची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय.
दिलीप जोशी यांच्या भेटीनंतर अमन सेहरावत हा देखील आनंदी झाल्याचे फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. अमन सेहरावत याच्यावर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातून काैतुकाच्या वर्षाव केला जातोय. आता तर थेट दिलीप जोशी हेच अमन सेहरावत याच्या भेटीला पोहोचले. दिलीप जोशी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.
