Viral Video : धक्कादायक! भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेत हात घातला, अभिनेत्याचा कंट्रोल सुटला; कुठे घडली घटना?
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्टेजवर भाषण देत असते. तेवढ्यात अभिनेता तिच्या कंबरेकडे टकमक पाहातो. नंतर थेट तिच्या कमरेला हात लावला. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिनेसृष्टीमधील कलाकार कधी काय करतीय याचा नेम नसतो. कधीकधी अभिनेत्यांचे वागणे इतके विचित्र असते की त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असेच काहीसे एका अभिनेत्याने केले आहे. भर कार्यक्रमात या अभिनेत्याने अभिनेत्रीच्या कमरेला हात लावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ही घटना कुठे घडली? हा अभिनेता कोण? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून भोजपूरी अभिनेता पवन सिंह आहे. तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पवन सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर आपल्या सह-नायिकेच्या कंबरेला हात लावताना दिसत आहे. त्याला हा विनोद करणे चांगलेच भोवले आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि त्याला ट्रोल केले जात आहे. मात्र, या वादावर अद्याप पवनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पवन सिंह ट्रेंड होताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तो आपली सह-नायिका अंजली राघवसोबत दिसत आहे. दोघांनीही पांढरे कपडे परिधान केले आहेत.
Video: तोंडातून रक्त आलं पण तो थांबला नाही! डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल
पवन सिंह ये क्या कर रहे हैं? आप ही लोग कुछ कहिए।#PawanSingh pic.twitter.com/RDJp4hUjzP
— Rohit Raj (@Rohitraj8480Raj) August 28, 2025
काय आहे व्हिडीओ?
स्टेजवर अंजली काहीतरी बोलत होती. त्याचवेळी बाजूला पवन सिंह माइक घेऊन उभा होता. अचानक अभिनेता नायिकेच्या कंबरेकडे पाहू लागतो आणि नंतर थेट हात लावतो. त्यानंतर तो म्हणतो, “काहीतरी लागलं आहे. इथे. थोडं हात बाजूला घे.” दुसरीकडे, अंजली अस्वस्थ होते. पण हसत हसत ती म्हणते, “नाही नाही. अरे बाजूला घेना हात” त्यानंतर पवन सिंह जेव्हा नीट पाहतो, तेव्हा त्याला कंबरेवर काहीच दिसत नाही. हा व्हिडीओ पाहून युजर्स खूप प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
पण पवन सिंहने अशा प्रकारे नायिकेला स्पर्श करणे लोकांना आवडले नाही. लोकांनी त्याला ट्रोल केले आणि काहींनी तर त्याला ‘चीप’ असेही म्हटले. काहींनी म्हटले की, नायिका अस्वस्थ झाली होती, पण तरीही तो थांबला नाही. काहींनी तर असेही म्हटले की, स्टार्सनी असे वागू नये. लोक त्यांना आपले आदर्श मानतात आणि ते उघडपणे अशा गोष्टी करतात.
