Video: तोंडातून रक्त आलं पण तो थांबला नाही! डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल
Emotional Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण फ्रेंच हॉर्न वाजवत आहे. त्या तरुणाच्या तोंडातून रक्त येतय पण तरीही तो थांबला नाही. हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

घरातल्या कर्त्या पुरुषावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. पण हा कर्ता पुरुष जास्त शिकलेला नसेल, हातात चांगली नोकरी नसेल, घरची परिस्थिती हालाकिची असेल तर मिळेल ते काम करुन पोट भरण्याचा प्रयत्न करत असतो. मग कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, मिळालेली वागणूक याचा तो जराही विचार करत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण फ्रेंच हॉर्न हे वाद्य वाजवत आहे. पण ते वाजवत असताना त्याला होणारा त्रास पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
berojgar_huu या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या तरुणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण फ्रेंच हॉर्न हे वाद्य वाजवत आहे. कदाचित एखादा कार्यक्रम असावा किंवा लग्न सोहळा. हे फ्रेंच हॉर्न वाजवताना त्या तरुणाच्या तोंडातून अक्षरश: रक्त येऊ लागले आहे. तरीही तो थांबला नाही. त्रास सहन करुनही तो तरुण फ्रेंच हॉर्न हे वाद्य वाजवत राहिला आहे. व्हायरल होणारा हा तरुणाचा व्हिडीओ कुठला आहे? कधीचा आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, या तरुणाच्या व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आता पर्यंत जवळपास 2 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यजूरने ‘पुरुष होणं सोपं नाही’ असे म्हटले आहे. तर काहींनी ‘घरातला कर्ता पुरुष’ अशी कमेंट केली आहे. काही यूजर्सने या तरुणाचा पत्ता विचारला आहे जेणे करुन ते त्याला मदत करु शकतील. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
