Video | ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला, पाहा नेमकं काय घडलं…

अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये झळकलेली दिगांगना, नुकतीच 'जलेबी'  या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Video | ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला, पाहा नेमकं काय घडलं...
दिगांगाना सूर्यवंशी

मुंबई : अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये झळकलेली दिगांगना, नुकतीच ‘जलेबी’  या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ती तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये एका मोराने तिच्यावर जोरदार हल्ला केला. तथापि, या हल्ल्यात अभिनेत्रीला काहीही दुखापत झालेली नसून, ती पूर्णपणे ठीक आहे. परंतु, तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे (Peacock attack on Veera Fame actress Digangana Suryavanshi).

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विराल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात दिगंगना एका सुंदर मोराच्या शेजारी उभी असलेली आणि त्याचे फोटो क्लिक करताना दिसत आहे. अचानक मोर तिच्यावर उडत हल्ला करतो, यावेळी ती मोरकडे पहात आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ती भयानक किंचाळत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओपाहून लोकांना फुटले हसू!

मोराच्या हल्ल्यानंतर किंचाळलेली दिगांगना देखील मोठ्याने हसताना दिसून येते. मात्र, आता तिच्या या व्हिडीओवर बरेच लोक हसत आहेत आणि काही वापरकर्ते मजेदार टिप्पण्याही देत ​​आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘व्वा बेटे व्वा…मौज कर दी’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘याने मला ‘मोर उडला’ची आठवण करून दिली’. आणखी एका वापरकर्त्याने केली की, ‘असे दिसते की मोराला त्याचे हरवलेले प्रेम परत सापडले आहे.’ दुसर्‍या व्यक्तीने कमेंट दिली, ‘हा भाई आ गया स्वाद’, त्याचबरोबर बर्‍याच हसणार्‍या इमोजीसुद्धा कमेंट केल्या आहेत (Peacock attack on Veera Fame actress Digangana Suryavanshi).

दिगंगनाची कारकीर्द

2002 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी ‘क्या हादसा क्या हकिकत’ या मालिकेतून बाल कलाकार म्हणून दिगांगनाने कारकीर्द सुरु केली. एक वीर की अरदास… वीरा या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. बिग बॉसच्या नवव्या पर्वातही ती सहभागी झाली होती. वयाच्या 17 व्या वर्षी बिग बॉसमध्ये सहभागी होणारी ती सर्वात तरुण स्पर्धक ठरली होती.

बॉलिवूड वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘फ्रायडे’ आणि जलेबी’ या दोन चित्रपटांतून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आश्चर्य म्हणजे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी 12 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदर्शित झाले होते. लवकरच अर्जुन रामपाल आणि सनी लिओनीसोबत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ती दिसणार आहे.

(Peacock attack on Veera Fame actress Digangana Suryavanshi)

हेही वाचा :

Deepika Padukone | MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, दीपिका पदुकोणने दिले मोठे कारण…

फ्लॉप चित्रपटांना वैतागून अभिषेकने घेतला होता मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचा निर्णय, मग अमिताभ म्हणाले…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI