
बिग बॉस 19 चा फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गाैरव खन्ना बिग बॉस 19 च्या सीजनचा विजेता ठरला. घरात दाखल झाल्यापासूनच विजेता होणार असल्याचे भाष्य करताना तो दिसला. विशेष म्हणजे गाैरव खन्ना याचा बिग बॉस 19 च्या घरातील प्रवास कधीही वादग्रस्त ठरला नाही. तो शांततेची भूमिका घेताना दिसला. बिग बॉस 19 चा विजेता गाैरव खन्ना जरी झाला असला तरीही बिग बॉस 19 च्या सीजनमध्ये सर्वाधिक चर्चेत तान्या मित्तल राहिली. तान्या मित्तल घरात जोरदार भांडणे करताना दिसली. हेच नाही तर सलमान खानने देखील अनेकदा तान्या मित्तलचा क्लास लावला. तान्या मित्तल बिग बॉसच्या घरात असताना अनेक मोठे दावे करताना दिसली. हेच नाही तर माझ्या घराच्या किचनमध्येही लिफ्ट असल्याचे तिने अनेकदा म्हटले.
आलिशान आणि एखाद्या राजमहलसारखा माझा बंगला आहे. असंख्य महागड्या गाड्या असून कित्येक एकरमध्ये गार्डन आमच्याकडे असल्याचे विविध दावे करताना तान्या मित्तल दिसली. फक्त हेच नाही तर बिग बॉस झाल्यानंतर मी तुमच्या घरी येते असेही सलमान खानला म्हणताना तान्या मित्तल दिसली. बाकी घरातील सदस्यांचे इतके छोटे घर मुंबईत आहेत की, माझे साहित्य त्यांच्या घरात बसू शकणार नाही.
यावेळी सलमान खान याने लगेचच स्पष्ट केले की, माझे घर 1 बीचके आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून पहिल्या दिवसापासूनच तान्या मित्तल आपली श्रीमंती सांगताना दिसली. घरात किती नोकर, किती पैसा आलिशान लाईफ यावर बोलताना ती दिसली. मात्र, जेवढे तान्या मित्तल बिग बॉसच्या घरात सांगत आहे तेवढे तिच्याकडे काहीच नसल्याचा दावा केला गेला. अखेर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल तिच्या ग्वाल्हेरच्या घरी पोहोचली आहे.
यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिचे स्वागत केले. यावेळी मोठी गाड्यांची रांग बघायला मिळाली. एका मोठ्या बंगल्यात तिचे स्वागत करण्यात आले. व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून आणि व्हिडीओंवरून असे सांगितले जात आहे की, तान्या मित्तल हिने जेवढे सांगितले होते, तेवढे नाही पण त्याच्या आसपास तिच्याकडे असावे. अनेकांचे म्हणणे आहे की, तान्या मित्तल दिखावा करत आहे.