AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मी थेट शिव्याच देतो..; अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाहबद्दल दिग्गज अभिनेते स्पष्टच म्हणाले..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते पियुष मिश्रा इंडस्ट्रीतील काही लोकांसोबत असलेल्या तणावपूर्ण संबंधांबद्दल स्पष्ट व्यक्त झाले. अनुराग कश्यपचा मला खूप तिटकारा असल्याचं ते म्हणाले.

आता मी थेट शिव्याच देतो..; अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाहबद्दल दिग्गज अभिनेते स्पष्टच म्हणाले..
Anurag Kashyap, Piyush Mishra and Naseerddin ShahImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 12:01 PM
Share

अभिनेते पियुष मिश्रा हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत 64 वर्षांच्या पियुष यांनी अनुराग कश्यप आणि नसीरुद्दीन शहा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं. अनुरागच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये भूमिका साकारलेल्या पियुष यांनी थेट सांगितलं की, “अनुराग आणि माझं अजिबात पटत नाही. मी त्याचा पूर्णपणे विरोध करतो.” तर नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत ‘मकबूल’मध्ये भूमिका साकारलेल्या पियुष यांनी त्यांच्यासोबतच्या बिनसलेल्या नात्याबद्दलही स्पष्ट सांगितलं. मला ते पसंत करत नाहीत आणि मी त्यांना पसंत करत नाही, असं ते म्हणाले.

शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत पियुष मिश्रा यांना त्यांच्या आवडत्या दिग्दर्शकाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी अनुराग कश्यप आणि इम्तियाज अली यांच्यापैकी इम्तियाजला निवडलं. ते पुढे म्हणाले, “मी कधीही इम्तियाजलाच निवडेन. तो उत्तम दिग्दर्शक आहे आणि तो दमदार पटकथा लिहितो. त्याच्यासोबत काम करून मला संतुष्टी मिळते. अनुरागसुद्धा हेच करतो. परंतु मी अनुराग कश्यपला कसा समजावू.. तो खूप जास्त बडबड करतो. असं करून तो विनाकारण स्वतःचंच नुकसान करून घेतो. तुम्ही एकतर स्वतःचं भलं करा किंवा दुसऱ्यांचं. पण तो स्वतःचाही विचार करत नाही. हीच त्याची समस्या आहे. मला त्याचा तीव्र तिटकारा आहे. मी आणि अनुराग फार क्वचित बोलतो. मी त्याच्याशी जास्त वेळ बोलू शकत नाही आणि तोही माझ्याशी फार वेळ बोलू शकत नाही. आम्ही फक्त शूटिंग करतो आणि आमचं काम एकत्र चांगलं जमतं.”

“जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या विरोधात जात असाल तर त्याचे किमान काहीतरी परिणाम व्हायला हवेत. मुख्य गोष्ट ही आहे की त्याला माहित आहे की त्याचे कोणतेही परिणाम होणार नाहीत. तरीही तो खूप जास्त बोलतो. मला याच गोष्टीचा तिरस्कार आहे. पूर्वी तो मला शिव्या द्यायचा, पण आता फक्त मीच त्याला शिव्या देतो,” असं त्यांनी सांगितलं. या मुलाखतीत पियुष मिश्रा यांना इंडस्ट्रीतील कोणत्या व्यक्तीसोबत तणावपूर्ण संबंध आहे, असादेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी नसीरुद्दीन शाह यांचं नाव घेतलं.

“माझे नसीरुद्दीन शाह यांच्याशी चांगले संबंध नाहीत. ते मला आवडत नाहीत आणि मी त्यांना आवडत नाही. जर तुम्ही एकमेकांना आवडत नसाल तर न बोलण्याची ही उत्तम संधी आहे. कारण तुम्हा दोघांनाही माहीत असतं की तुम्ही एकमेकांना पसंत करत नाही, त्यामुळे बोलण्याची काही गरज नाही”, असं ते स्पष्ट म्हणाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या