Oscars 2023: ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

Oscars 2023 मध्ये भारताचा बोलबाला; दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देत म्हणाले..., सर्वत्र मोदी यांच्या ट्विटची चर्चा

Oscars 2023: ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
Natu Natu
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 13, 2023 | 3:30 PM

Oscars 2023 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भराताचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. ज्यामुळे कलाकार आणि भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्कर विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरल्यानंतर मोदी यांनी नाटू नाटू गाण्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘असाधारण नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता वैश्विक आहे. हे एक असं गाणं आहे, जे येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत प्रत्येकाच्या लक्षात राहिल. एमएम कारावनी, चंद्रा बोस आणि इस प्रतिष्ठित सम्मानासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा…’ सध्या मोदी यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलीफेंट विस्पर्स’ (The Elephant Whisperers) च्या टीमला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या मोदी यांनी ट्विट करत दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

लॉस एंजेलिस येथे आयोजित 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये संपूर्ण देशाच्या नजरा भारतावर खिळल्या. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली तेव्हापासून कलाकार आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज अखेर परदेशात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने जगभरात प्रत्येकाला वेड लावलं आहे. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.