AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poonam Pandey Death : पतीकडून सतत मारहाण, मेकअपने लपवायची जखमा, गंभीर आजार, पूनम पांडेचं निधन

Poonam Pandey Death News : वैवाहिक आयुष्याचं सुख नाही, स्वतःच्या मर्जीने श्वास घेणं देखील कठीण, पतीकडून सतत मारहाण... गंभीर आजारामुळे अखेर पूनम पांडेने घेतला अखेरचा श्वास... वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडे हिने संपवलं आयुष्य...

Poonam Pandey Death : पतीकडून सतत मारहाण, मेकअपने लपवायची जखमा, गंभीर आजार,  पूनम पांडेचं निधन
| Updated on: Feb 02, 2024 | 12:18 PM
Share

Poonam Pandey Death News : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झालं आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे पूनम हिने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती तिच्या मॅनेजरने दिली आहे. पूनम हिच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पूनम हिला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. वैवाहिक आयुष्यात देखील पूनम हिला आनंद मिळाला नाही. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘लॉक अप’ शोमध्ये पूनम हिने तिच्या खासगी आयुष्यात घडलेल्या धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या.

सोशल मीडियावर कायम आपल्या बोल्ड आणि हॉट अदांना चाहत्यांना घायाळ करणारी पूनम पांडे हिने घरगुती हिंसाचाराचा सामना केला होता. अभिनेत्रीने सॅम बॉम्बे नावाच्या व्यक्तीसोबत मुंबईत गुपचूप लग्न केलं होतं. पूनम आणि सॅमचे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. पूनमने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

दाखल केलेल्या तक्रारीत पूनम हिने अनेक धक्कादायक गोष्टी मांडल्या होत्या, पती सॅम बॉम्बे याच्याकडून सतत होणाऱ्या मारहाणीमुळे अभिनेत्री ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. पूनम चार मजल्याच्या इमारतीत पतीसोबत राहत होती. पण पूनम पतीच्या परवानगी शिवाय घरातून बाहेर येऊ शकत नव्हती. सॅम ज्याठिकाणी जायचा तेथेच पूनम जाऊ शकत होत.

11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनमला सॅमने एकदा नव्हे तर अनेकदा मारहाण केली होती. अंगावरचे आणि चेहऱ्यावरील जखमा ती मेकअपने लपवायची. आश्चर्याची बाब म्हणजे हनीमूनच्या वेळीही सॅमने पूनमला मारहाण केली होती. पूमन हिच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… सध्या सर्वत्र पूमन हिची चर्चा रंगली.

पूनम हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पूनम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती होती. ‘लॉक अप’ या शोमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. सोशल मीडियावर देखील पूनम कायम सक्रिय होती. सोशल मीडियावर पूनम हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक जण अभिनेत्रीला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.