AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, विकी कौशलचा जबरदस्त लूक!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच उरी द सर्जिकल स्ट्राईकनंतर आदित्य धरच्या 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama movie) या चित्रपटातमध्ये दिसणार आहे.

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, विकी कौशलचा जबरदस्त लूक!
| Updated on: Jan 11, 2021 | 2:09 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच उरी द सर्जिकल स्ट्राईकनंतर आदित्य धरच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ (The Immortal Ashwatthama movie) या चित्रपटातमध्ये दिसणार आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. विकी कौशलने चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटाला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. (Poster release of ‘The Immortal Ashwatthama’ movie)

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्की कौशलने चित्रपटाची दोन पोस्टर शेअर केले आहेत, पोस्टरमध्ये विकीचा लूक जबरदस्त दिसत आहे. हा चित्रपट पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. विकी कौशलनेही या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बरीच तयारी केली आहे. विकी या चित्रपटासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे.

या चित्रपटात विकी कौशल महाभारतातील महान योद्धा ‘अश्वत्थामा’ ची भूमिका साकारणार आहे. 2021 च्या एप्रिलमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट 3 भागात रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात अश्वत्थामा आधुनिक काळातील सुपरहिरो म्हणून दाखविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे विकीला त्याचे 100 किलोपक्षाही जास्त वजन वाढवायचे आहे. यासाठी विकी वर्कआउट करत आहे. या चित्रपटाशिवाय विकी कौशल शहीद उधम सिंग, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची बायोपिक आणि करण जोहरची ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

रामूला मोठा झटका, कलाकारांचे कोट्यवधी थकवल्याप्रकरणी संघटनेची मोठी कारवाई!

Kangana Ranaut | मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगना-रंगोलीला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

Ranbir Kapoor | लव्ह रंजन चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर दिल्लीत, चाहत्यांकडून जंगी स्वागत!

(Poster release of ‘The Immortal Ashwatthama’ movie)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.