AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गजनी’ फेम अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन, कुटुंबियांसाठी मागे ठेवली इतकी प्रॉपर्टी

'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना फार मोठा धक्का बसला आहे. तर, बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे... वयाच्या 74 व्या एका गंभीर आजाराने त्यांचं निधन झालं असून, त्यांनी कुटुंबियांसाठी गडगंड प्रॉपर्टी मागे ठेवली आहे.

'गजनी' फेम अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन, कुटुंबियांसाठी मागे ठेवली इतकी प्रॉपर्टी
Pradeep Rawat
| Updated on: Aug 05, 2026 | 12:20 PM
Share

प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत प्रदीप रावत यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीप यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रदीप यांनी फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, तामिळ, तेलुगू आणि नेपाळी सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण ‘गजनी’ फेम अभिनेते अचानक चाहत्यांना रडवून गेले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजली वाहिली… प्रदीप रावत यांच्या प्रकृतीबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरचा सामना करत होते. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पण रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी प्रदीप रावत यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप रावत यांनी त्यांच्या पाठी कुटुंबियांसाठी मोठी प्रॉपर्टी सोडली आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीत, प्रदीप रावत यांनी अनेक भाषांमधील सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, निधनाच्या वेळी प्रदीप रावत यांची एकूण संपत्ती अंदाजे 5 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट सिनेमांममध्ये मुख्य खलनायकाची भूमिका साकारून त्यांनी ही संपत्ती कमावली होती. त्यांच्या पश्चात त्यांनी पत्नी आणि एक मुलगा आहे.

‘महाभारत’ मुळे मिळली ओळख…

प्रदीप रावत यांनी त्यांच्या करियरची सुरुवात टीव्ही विश्वातून केली. बी. आर. चोप्रा यांच्या आयकॉनिक ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी ‘अश्वत्थामा’ ही भू्मिका साकारत चाहत्चांचं मनोरंजन केली. ज्यामुळे प्रदीप घराघरात पोहोचले. टीव्ही विश्वात नाव मोठं केल्यानंतर त्यांनी सिनेमांमध्ये पदार्पण केलं आणि मोठ्या पडद्यावर देखील एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. त्यानतंर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

या सिनेमांमधून रचला इतिहास

अभिनेता आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘लगान’ (Lagaan) या सिनेमात त्यांनी ‘देवा’ ही भूमिका साकारली. त्यानंतर, आमिर खानच्या ‘गजनी’ (Ghajini) या ब्लॉकबस्टर सिनेमात त्यांनी ‘गजनी धर्मात्मा’ हा क्रूर मुख्य खलनायक साकारला; या भूमिकेमुळे त्यांच्या कारकिर्दीला नवी उंची मिळाली. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे.

Follow Us
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा