Prajakta Gaikwad On Wedding : प्राजक्ता गायकवाड हिने रिसेप्शनमध्ये का घेतली नंदीवरुन एन्ट्री? पुराणांमध्ये आहे उल्लेख

Prajakta Gaikwad On Wedding : वर - वधूबद्दल पुराणांमध्ये काय सांगितलंय? ज्यामुळे प्राजक्ता गायकवाड हिने रिसेप्शनमध्ये नवऱ्यासोबतल घेतली नंदीवरुन एन्ट्री..., सध्या सर्वत्रळ फक्त आणि फक्त प्राजक्ता गायकवाड हिच्या वक्तव्याची चर्चा..

Prajakta Gaikwad On Wedding : प्राजक्ता गायकवाड हिने रिसेप्शनमध्ये का घेतली नंदीवरुन एन्ट्री? पुराणांमध्ये आहे उल्लेख
Prajakta Gaikwad On Wedding
| Updated on: Dec 17, 2025 | 2:09 PM

Prajakta Gaikwad On Wedding : स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील येसूबाईंच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ता गायकवाड हिने उद्योजक शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्न केलं आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी प्राजक्ता आणि शंभुराज लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पण सर्वांचं लक्ष येऊन थांबलं ते म्हणजे, शंभुराज आणि प्राजक्ता यांनी रिसेप्शनमध्ये घेतलेल्या एन्ट्रीकडे… इतरांपेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने दोघांनी एन्ट्री केली.

प्राजक्ता आणि शंभुराज यांनी शाही थाटात किंवा घोड्यावरुन मंडपात एन्ट्री केली नाही. तर त्यांनी चक्क नंदीवर एन्ट्री केली. अनेकांना दोघांनी घेतलेली एन्ट्री फार आवडली, तर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. यावर नुकताच प्राजक्ता हिने स्पष्टीकरण दिलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, ‘आमची एन्ट्री खास होती… लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला. पण काहींनी ट्रोल देखील केलं… मला प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे की, जेव्हा लग्न होतं तेव्हा स्त्री – पुरुष फक्त वधू – वर नसतात… तर त्यांनी शिव – पार्वती म्हणून देखील संबोधलं जातं. याबद्दल मला कोणी सांगितलं नाही तर, पुराणांमध्ये देखील याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे… त्या दिवशी वधू – वर, शिव – पार्वती यांच्या स्वरुपात असतात.’

पुढे प्राजक्ता म्हणाली, ‘मोठ्याने डीजे लागलाय आणि सगळे तिथे नाचत आहेत अशी एन्ट्री मला नकोच होती… शिवाय त्यांचं ना नाव शंभुराज असल्यामुळे ही संकल्पना नावाशीही जोडलेली होती… आमच्या लग्नानंतर ही संकल्पना ट्रेंडमध्ये येईल असंही ला वाटलं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता गायकवाड हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

रिसेप्शनमध्ये ‘लाल परी’ बनली प्राजक्ता

लग्नात हिरव्या नऊवारीतील पारंपरिक महाराणी लूकमध्ये दिसलेली प्राजक्ता रिसेप्शनसाठी लाल रंगाची अतिशय सुंदर भरजरी साडी नेसून आली होती. सोनेरी जरीच्या नाजूक नक्षीकामाने खुललेली ही साडी आणि त्याला साजेशी नथ, मोत्यांचे दागिने यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. 

प्राजक्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची आवड असल्याने तिने अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. विविध मालिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.