AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललं; म्हणाली “प्राजक्तराजमुळे अडथळे..”

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या दागिन्यांच्या ब्रँडबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षापासून तिने ब्रँडचं नाव बदललं आहे. हे नवीन नाव काय आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय, याविषयी तिने व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललं; म्हणाली प्राजक्तराजमुळे अडथळे..
Prajakta MaliImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2026 | 3:48 PM
Share

अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयासोबतच उद्योग क्षेत्रातही आपला विशेष ठसा उमटविला आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी तिने पारंपरिक इमिटेशन दागिन्यांचा ‘प्राजक्तराज’ हा ब्रँड लाँच केला होता. हा ब्रँड महाराष्ट्रातून हळूहळू देशभरात आणि त्यानंतर जगभरात पोहोचला. आता 2026 च्या नवीन आर्थिक वर्षात तिने या ब्रँडबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने या निर्णयाबद्दलची सर्वांना माहिती दिली आहे. प्राजक्ताच्या दागिन्यांच्या ब्रँडचं नाव आता बदललं असून ते ‘प्राजक्तसाज’ असं ठेवण्यात आलं आहे. यामागचं कारण तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

काय म्हणाली प्राजक्ता?

“31 मार्चपासून नवीन आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे, प्राजक्तसाज.. Reviving Maharashtra’s Legacy. ही खूप मोठी गोष्ट आहे. तीन-सव्वा तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा हा ब्रँड सुरू केला, तेव्हा मला बिझनेसविषयी काहीच कल्पना नव्हती. एकच विचार होता की महाराष्ट्रातले मराठी दागिने, कालातीत होत असलेले दागिने अशांना पुन्हा झळाळी देण्याचा होता. तेव्हा बिझनेसचा एवढा विचार केला नव्हता. जसा ब्रँड मोठा होत गेला, तसा तो केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जहभरात पोहोचेल याचीही कल्पना केली नव्हती. परंतु शिपिंग करताना काही अडथळे आले आणि त्यातून मार्ग काढताना हे नवीन नाव सुचलेलं आहे,” असं प्राजक्ताने सांगितलं आहे.

याविषयी ती पुढे म्हणाली, “आम्हाला लोगो पण बदलायचा होता, परंतु त्याच्याइतका अनोखा लोगो डिझाइन आम्हाला मिळाला नाही. मला अर्थातच नावातलं प्राजक्त बदलायचं नव्हतं. दागिन्यांचा ब्रँड हा साजमुळे प्रस्थापित होतो. त्यामुळे प्राजक्तराज.. पारंपरिक मराठी साज यापैकी पहिलं आणि शेवटचं नाव घेऊन ‘प्राजक्तसाज’ असं नवीन नाव ठेवलं. अर्थात अजून बरीच कारणं आहेत, जी मी तुम्हाला सांगू शकणार नाही, तुम्हाला ती कळणार नाहीत. पण माझा पूर्ण विश्वास आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ”

या ब्रँडअंतर्गत प्राजक्ता माळीने महाराष्ट्राच्या अनेक पारंपरिक दागिन्यांना पुन्हा एक नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा ब्रँड आता जगभरात पोहोचला आहे. त्याचा खप संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही वाढल्याची माहिती प्राजक्ताने या व्हिडीओतून दिली.

Follow Us
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...